प्रा. भाऊ लोखंडे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची अपरिमित हानी :देवेंद्र फडणवीस
- by Adarsh Maharashtra
- Sep 22, 2020
- 1964 views
नागपूर, 22 सप्टेंबर: आंबेडकरी साहित्याचे गाढे अभ्यासक, नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे माजी प्रमुख प्रा. भाऊ लोखंडे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे.
प्रा. भाऊ लोखंडे यांनी बौद्ध आणि दलित साहित्याच्या चळवळीत मोठे योगदान दिले. रशियातील बौद्धधर्म, मराठी साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव अशा अनेक विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले, व्याख्याने दिली. इतर देशांमध्येही त्यांची व्याख्याने बरीच गाजली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव आणि कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता त्यावर उदबोधन हे त्यांचे वैशिष्ट्य होते. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी स्वत:ला या कार्यात झोकून दिले होते. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे कुटुंबीय, आप्तपरिवाराच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम