फेसबुकवरील नाव वापरून लुटणारी टोळी सक्रिय........
- by Adarsh Maharashtra
- Oct 12, 2020
- 2269 views
नागपूर : काही सायबर चोरटे फेसबुकरील मूळ व्यक्तीच्या नावाने बनावट फेसबुक पान तयार करून त्याद्वारे लोकांकडून आर्थिक मदत मागत आहेत. हा प्रकार राज्यात सर्रास सुरू असून या माध्यमातून आय.पी.एस. अधिकाऱ्यांपासून ते समाजातील अनेक नामांकित व्यक्तींना लक्ष्य करण्यात आले आहे.
फेसबुकवर आय.ए.एस., आय.पी.एस. व नामांकित व्यक्तींना लक्ष्य करून त्यांच्या नावाने बनावट पान तयार करायचे. त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीचा अपघात, त्यांच्या कुटुंबीयातील कुणाचे आजारपण आदींची माहिती प्रसिद्ध करून त्यांच्या मित्रमंडळींना मदतीचे आवाहन करायचे. नामांकित व्यक्ती असल्याने त्यांच्या मित्रमंडळीपैकी कुणाही दिलेल्या बँक खात्यांमध्ये पैसे वळते करून मदत करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे नुकतेच सी.आय.डी. उपमहानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, नागपुरातील प्रसिद्ध डॉक्टर उदय बोधनकर, नागपुरातील एक वरिष्ठ पत्रकार यांच्या नावाने असे प्रकार करण्यात आले. त्यामुळे फेसबुकवर अशा प्रकारे कुण्या मित्राने व परिचयातील व्यक्तीने संदेश टाकलेला तुम्हाला दिसल्यास दिलेल्या बँक खात्यांवर पैसे जमा करण्यापूर्वी त्या मित्राच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून खात्री करून घ्या. फेसबुक, ट्विटर किंवा इतर समाजमाध्यमांवरील खाते आपण ओ.टी.पी. कुणाला सांगितल्याशिवाय हॅक होत नाही. त्यामुळे कुणालाही ओ.टी.पी. सांगू नका. तसेच सर्व समाजमाध्यमांमध्ये ‘टू स्टेप व्हेरिफिकेशन’ ही सुविधा आहे. सायबर चोरटय़ांनी तुमचे खाते हॅक करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला दोन वेगवेगळ्या प्रकारचे पासवर्ड लागतील. एका व्यक्तीचे दोन पासवर्ड मिळवणे त्यांच्यासाठी अवघड आहे. -अशोक बागुल,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम