मुख्यमंत्र्यांनी दडपली संपत्ती !!! भाजपा नेते डॉ.किरीट सोमैयांची आयकर विभागाकडे तक्रार !!!
- by Adarsh Maharashtra
- Feb 08, 2021
- 693 views
मुंबई :श्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती दडपली आहे, निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती प्रत्यक्ष कागदपत्रांसमोर/ करारपत्रांसमोर पडताळणी केले असता हे साफ दिसून येत आहे की निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती ही पूर्णसत्य नाही व माहिती लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे!
उद्धव ठाकरे यांनी दडपलेल्या संपत्ती संदर्भात निवडणूक आयोग दिल्ली येथे तक्रार दाखल केल्या नंतर आज 8 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाच्या इन्वेस्टिगेशन विंगच्या महासंचालक श्रीमती भानुमती यांच्याकडे तक्रार दाखल करून सदर प्रकरणाची चौकशी/पडताळणी करण्याची विनंती केली.
उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीचे खरेदी मूल्य रू.4,37,00,000 दाखवले आहे. पण करारामध्ये बाजार मूल्य रु.4,14,00,000 असल्याचे दिसून येते परंतू, खरेदी मूल्य रु.2,10,00,000 असल्याचे दिसून येते.
श्रीमती रश्मी उद्धव ठाकरे यांनी 19 घरांचा (एकूण 23,500 स्क्वे.फूट बांधकाम), 8 वर्षांचा (1/4/2013 ते 31/3/2021 पर्यंत) प्रॉपर्टी टॅक्स/कर 12 नोव्हेंबर 2020 रोजी भरला. ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डनुसार एकूण संपत्तेचे बाजार मूल्य रु.5,29,00,000 आहे.
अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांच्याकडे कोर्लाई, अलिबाग येथे रु.10.50 कोटी रुपयांची जमीन व मालमत्ता आहे पण सांपत्ती/मालमत्तेची किंमत व मूल्य रु.2.10 कोटी एवढीच दाखवली आहे !
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम