रायगड जिल्ह्याचे जिल्हाअधिकारी पदी डॅा. योगेश म्हसे!

रायगड- रायगड जिल्ह्याचे जिल्हाअधिकारी डॅा. महेंद्र कल्याणकर यांची नुकताच कोकण विेभागीय आयुक्त म्हणुन नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा रिक्त पदी डॅा. योगेश म्हसे यांची नियुक्ती करणेत आली आहे. 

डॅा. योगेश म्हसे हे म्हाडाचे कार्याधिकारी म्हणुन कार्यरत होते, एक धडाकेबाज अधिकारी म्हणुन त्यांची ओळख आहे. नवनिर्वाचित जिल्हाअधिकारी डॅा. योगेश म्हसे यांनी भिवंडी निजामपूर महानगरपालिका आयुक्त, तसेच पिंपरी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुनही काम केले आहे. त्यांना प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव असल्याने त्यांचा अनुभवाचा रायगड जिल्ह्यालाही अधिक फायदा होईन असे बोलले जात आहे. 

 दरम्यान कोकण आयुक्त पदी नियुक्त झालेले रायगडचे जिल्हाधिकारी डॅा. महेंद्र कल्याणकर यांनीही रायगडात उल्लेखनीय काम केल्याचे दिसुन आले आहे. त्यांची कोकण विभागीय आयुक्त पदी नियुक्ती झाल्याने त्यांचा रिक्त झालेल्या जागेवर आता डॅा. योगेश म्हसे नवीन जिल्हाअधिकारी म्हणुन हजर झाले आहेत.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट