वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्षपदी दिलीप पवार यांची नियुक्ती .

बदलापूर(प्रतिनिधी) : वंचित बहुजन आघाडीच्या अंबरनाथ तालुकाध्यक्षपदी दिलीप पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दिलीप पवार यांनीही या नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त करून पक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू,अशी ग्वाही दिली आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांच्या अध्यक्षतेखाली भिवंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत  दिलीप पवार यांची नियुक्ती जाहीर  करण्यात आली. यावेळी ठाणे जिल्हा महासचिव भगवान गायकवाड ,जयवंत बैले, जिल्हा प्रवक्ता बी. बी. प्रधान, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.जानू मानकर,महेश कुमार भोईर, अंबरनाथ तालुका उपाध्यक्ष दिलीप सोनकांबळे, अविनाश गाडे,अंबरनाथ पूर्व शहर अध्यक्ष प्रविण गोसावी, कल्याण पूर्व अध्यक्ष संतोष गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख योगेश येलवे, नवनीत तायडे आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट