माझा लोकसभेचा पेपर परीक्षे आधीच फुटला- नरेंद्र पाटील
- by Adarsh Maharashtra
- Mar 03, 2019
- 3833 views
साताऱ्याची लोकसभेची जागा शिवसेनेची कि भाजपची हा निर्णय उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. मात्र त्याआधीच माझा लोकसभा परीक्षेचा पेपर फुटला आहे. असे भाजपचे संभाव्य उमेदवार आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी म्हणले आहे.
महामंडाच्या माध्यमातून युवकांना उद्योग उभा करण्यासाठी कर्जाच्या पुरवठ्या बाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलो होतो तेव्हा शिवेंद्र राजे भेटले म्हणून त्यांच्या सोबत मिसळ खायला गेलो. आम्हाला मिसळ गोड लागली मात्र त्याचा राजकीय ठसका मात्र बाकीच्यांना लागला असे नरेंद्र पाटील म्हणाले आहेत. उदयनराजेंनी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील शिक्के काढावे. हे काम लोकसभा निवडणुकीच्या आधी झाले तर त्यांनाच शेतकऱ्यांची अधिकची ४ हजार मते मिळतील असे नरेंद्र पाटील म्हणाले आहेत.
शिवेंद्र राजे यांच्या सोबत खाल्लेली मिसळ आम्हाला दोघांना गोड लागली मात्र याचा ठसका साताऱ्यात बऱ्याच लोकांना लागला. तर या मिसळची चर्चा दिल्ली पर्यंत झाली काही आमदार म्हणाले आम्हाला पण विधानसभेत हि मिसळ पाठवा असे नरेंद्र पाटील म्हणाले आहेत. उदयनराजेंवर तुमच्या माध्यमातून भाजपमध्ये येण्यासाठी दबाव टाकला जात आहे का असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता नरेंद्र पाटील म्हणाले कि, हा मतदारसंघ युती झाल्यानंतर शिवसेनेला जाणार कि भाजपकडे राहणार या बाबत अद्याप निर्णय झाला नाही. माझ्या बाबत बोलत असाल तर माझा लोकसभेचा पेपर परीक्षेच्या आधीच फुटला आहे.
यावेळी साताऱ्यात युतीचा खासदार निवडून येणार आहे. तो खासदार अधिवेशन काळ सोडून इतर वेळी मुंबई पुण्यात न राहता इथं मतदारसंघात राहून जनतेची कामे करेल असे नरेंद्र पाटील यांनी म्हणाले आहे

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम