बदलापुरातील सामाजिक कार्यकर्ते केशव म्हात्रे यांचे निधन.

बदलापूर / प्रतिनिधी : सामाजिक कार्यकर्ते आणि श्री सदस्य परिवारातील ज्येष्ठ सदस्य केशव बारकु म्हात्रे (५७) यांचे गुरुवारी (ता.१३)  हृदयविकाराने निधन झाले. शिवसेना शहर प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचे ते थोरले बंधू होते. शांत मितभाषी  अशीही त्यांची ओळख होती. कोरोना संक्रमण काळात देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून बदलापुरात वृक्षारोपण रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, स्वच्छता अभियान या सारखे सामाजिक उपक्रम राबवताना ते नेहमी अग्रभागी असायचे. शिवसेनेच्या सामाजिक कार्यात देखील त्यांचा सहभाग महत्वपुर्ण होता. केशव म्हात्रे यांच्या अकाली निधनाने म्हात्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याची प्रतिक्रिया वामन म्हात्रे यांनी दिली. रेशन दुकान चालवत असल्याने ते रेशन दुकानदारांच्या समस्यांसह सर्वसामान्य रेशन धारकांना रेशन मिळावे यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असायचे. कोराना संक्रमण काळात देखील शहरातील जास्तीत जास्त शिधापत्रिकाधारकांना व शिधापत्रिका नसलेल्यांना गोरगरिबांना रेशनवर धान्य मिळावे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या अकाली निधनाने एक चांगला सामाजिक कार्यकर्ता गमावल्याची भावना बदलापुरात व्यक्त होत आहे.

संबंधित पोस्ट