वडूथ येथे ग्रामीण कोवीड सेंटर ची लवकरच उभारणी- आमदार शशिकांत शिंदे

सातारा :कोरोना संसर्गाची लक्षणे असलेल्या ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील कोरोना बाधीत रूग्णांवर तात्काळ प्राथमिक उपचार व्हावेत याची खबरदारी घेऊन अंगापूर नंतर आता वडूथ ता. सातारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीमध्ये पन्नास बेडच्या कोवीड सेंटरची दि.१५ अखेर उभारणी करण्यात येणार असून येथे आँक्सिजन टँक, इतर औषधे व रेमडिसीव्हीर इंजेक्शन स्वखर्चाने देणार आहे.

वडूथ येथील कोवीड सेंटरच्या उभारणीची पहाणी केली. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विविध प्रकारच्या आजारांवर उपचार केले जात असून गरीब कुटुंबातील कोरोना बाधीत रूग्णांना खाजगी हाँस्पिटल मधील उपचार घेण्यासाठी ४०ते ५० हजार रूपये खर्च येत आहे. बील भरताना संबंधित कुटुंबातील लोकांपुढे मोठी अडचण निर्माण होत आहे. तर कोरोनाची प्राथमिक लक्षणे असलेल्या रूग्णांवर तातडीने उपचार झाल्यास पुढील धोका टळणार असल्याने अंगापूर येथे २० बेडचे आयसोलेशन केंद्र उभारण्यात आले आहे. आता वडूथ ता. सातारा येथील  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीमध्ये ३० बेडचे कोवीड उपचार केंद्र सुरू करण्यात येणार असून या ठिकाणी १० आँक्सिजन बेड, ५ आय सी यू बेड, १५ सर्वसाधारण बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या मदतीने येथे डॉक्टर, नर्सेस, व पँरामेडीकल स्टाप उपलब्ध करण्यात येणार असून रूग्णांना आँक्सिजन, इतर औषधे व रेमडिसीव्हीर इंजेक्शन चा होणारा खर्च स्वतः करणार आहे. ग्रामीण स्तरावरील अशी कोवीड सेटर चांगले माँडेल म्हणून पुढे येतील व गाव पातळीवरच कोरोना बाधीत रूग्णांना उपचार करणे सोयीचे होईल. 

या ठिकाणी कोरोना संसर्गाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची कोवीड आरटीपीसी तपासणी विनाखर्च करण्यात येणार असून येथील कोवीड सेंटरसाठी आ. शशिकांत शिंदे यांनी दहा लाख रूपये निधी दिला असल्याचे पंचायत समितीचे सदस्य राहुल शिंदे यांनी सांगितले. या कोवीड सेंटर मुळे वाढे, पाटखळ, वडूथ, शिवथर, मालगाव, महागाव, क्षेत्रमाहुली, लिंब,  गोवे,  सातारारोड, पाडळी व त्या अंतर्गत असलेल्या वाडी वस्तीवरील गावांना उपयोग होणार असून कोवीड रूग्णावर तात्काळ उपचार होण्यासाठी मदत मिळणार आहे.  

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते,  सतिश चव्हाण, किरण साबळे पाटील, वनिता गोरे,  राहूल शिंदे,जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट