युगंधर मराठे पालिकेचा जावई आहे का? अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या या अधिकाऱ्यावर कारवाई केंव्हा?

मुंबई-पालिकेच्या बी विभागात सध्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत आहेत त्याबद्दल लोकांच्या तक्रारी येत आहेत पण लोकांच्या तक्रारींना फाट्यावर मारून अनधिकृत बांधकामे वाचवणारा सहाय्यक अभियंता युगंधर मराठे पालिकेचा जावई आहे का ? त्याच्यावर का कारवाई केली जात नाही इथले जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत ते डोळे झाकून  का बसलेत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना ही अनधिकृत बांधकामे आणि भूमाफिया व युगंधर मराठेची आर्थिक सेटिंग मान्य आहे का? एखाद्या गरीब माणसाने एक फूट झोपडे वाढवले तर त्याच्या दारात कारवाई साठी पठाणासारखे उभे राहणारे पालिका अधिकारी बी विभागातील राजरोस सुरू असलेल्या बांधकामा बाबत गप्प का बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्यांनी युगंधर माराठेच्या तोंडात किती रुपये कोंबलेत असे इथले लोक विचारात आहेत .