महाराष्ट्रात कोरोनाचे नवे २३६१ रुग्ण, तर ७६ रुग्णांचा मृत्यू

मुंबई, १ जून:-महाराष्ट्रात करोनाचे २३६१ रुग्ण आढळले आहेत. तर ७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ७० हजार १३ इतकी झाली आहे.२४ तासात ७७९ करोना रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत ३० हजार १०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला ३७ हजार ५३४ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यात आज 2361 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 70013 अशी झाली आहे. आज नवीन 779 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 30108 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 37534 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूची ८३९२ नवीन प्रकरणं समोर आली आहेत. याशिवाय एका दिवसात २३० रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना रुग्णांची संख्या १,९०,५३५ वर पोहोचली आहे. एकूण मृत्यू ५३९४ आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत ९१,८१९ लोकांना डिस्चार्ज देण्यात आल आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट