लग्राचे अमिष दाखवून युवतीवर अत्याचार

मेढा : लग्नाचे अमिष दाखवून युवतीवर सातारा शहर आणि आणि जिल्ह्याबाहेर ठिकठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी कृष्णकांत सूर्यकांत इंदलकर 393 करंजे पेठ जुना हायवे पाराजवळ याच्यावर मेढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.फिर्यादीच्या दाखल झालेल्या फिर्यादीनुसार आरोपीने संबंधित युवतीची फेसबुक द्वारे ओळख वाढवली व तिला लग्नाचे आमिष दाखवून 30 एप्रिल 2020 ते 20 डिसेंबर 2022 दरम्यान यवतेश्वर, बामणोली, दापोली, गुहागर, चिपळूण येथे फिरायला घेऊन जाऊन वेळोवेळी तिच्याशी इच्छाविरुद्ध शरीर संबंध केले. संबंधित युवती या प्रकरणात चार महिन्याची गरोदर राहिली. त्यानंतर संबंधित युवतीवर दबाव टाकून तिचा गर्भपात करण्यात आला. संबंधित युवतीची फसवणूक झाल्याने तिने शुक्रवारी मेढा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर अधिक तपास करत आहेत.

संबंधित पोस्ट