लॉक डाऊन विरूद्ध जन प्रक्षोभ

घरात बसून लॉक डाऊन एन्जॉय करणारे श्रीमंत नेते, उद्योजक आणि सेलिब्रिटींनो सावधान! कारण गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाच्या भीतीने घरात कोंडून ठेवलेल्या लोकांचा आता संयम सुटत चालला आहे. काल नालासोपारा रेल्वे स्थानकात जे बघायला मिळाले ते यापुढे इतरही ठिकाणी दिसू शकते त्यामुळे लोकांच्या उद्रेकाला यापुढे कसे थोपवणार आहात? आणि किती दिवस पोलिस संरक्षणात फिरणार  आहात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा नावाखाली लोकांना देशोधडीला लावून तुम्ही तुमच्या आलिशान बंगल्यात एअर कंडीशन फ्लॅट मध्ये सुखाने जगू शकणार नाही कारण लॉकडाऊन मध्ये नोकरी धंदा गमावल्याने गेले चार महिने उपासमारीने मरणाऱ्या गोरगरीब जनतेचे त्यांच्या निष्पाप मुलाबाळांचे शाप तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांना सुखाने जगू देणार नाहीत. कोरोनाच्या भीतीने सतत लॉक डाऊन वाढवून लोकांना बेरोजगार करणाऱ्या राज्यकर्त्यानो तुम्हाला एवढी जर कोरोनाची भीती वाटतेय तर या देशावरचे कोरोनाचे संकट संपेपर्यंत जेथे कोरोना नाही तिथे जाऊन रहा आणि कोरोनाचे संकट संपल्यावर भारतात या! तुमच्यासारख्या डरपोक राज्यकर्त्यां पासून जनतेचे काहीही अडणार नाही. कारण लोकांनी आता कोरोनासोबत जगण्याची मानसिकता बनली आहे. कोरोना विरूद्ध लढता लढता जगू आणि लढता लढता मरू पण यापुढे कोरोनाच्या भीतीने घरात कोंडून मरायचं नाही असं लोकांनी ठरवल आहे हिंदुस्तान हा लढवय्यांचा आहे. हिंदुस्तानी जनतेने आजवर अशी हजारो नैसर्गिक आणि मानवी संकटाचा सामना करून त्या संकटाना हरवलं आहे. कोरोनालाही नक्की हरवू  पण डरपोक राज्यकर्त्यांच्या सांगण्यावरून घरात बसून कोरोनाला हरवणार नाही तर घराबाहेर पडून कामधंदा सांभाळून कोरोना विरोधाची ही लढाई आम्ही जिंकू कारण या हिंदुस्तानी जनतेच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई, शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा लढाऊ बाणा आहे. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढाईत मेलो तरी चालेल पण देशाचं अर्थचक्र चालवून लढत राहणार. शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि कोरोनाच्या भीतीने लोकांना घरात कोंडून मरायचं हाच  काय तुमचा मराठी बाणा? महाराजांवर मोठं मोठी संकटे आली. आदिलशाह, निजाम शाह, मोगल बादशाह, टोपीकर इंग्रज पण या सर्व संकटाना महाराजांनी धैर्याने तोंड देऊन ही संकटे परतवून लावली त्या शिवप्रभुंच्या मराठी  मातीत कोरोनाच्या भीतीने  जनतेला घरात कोंडून उपाशी मारणारे आणि स्वतःही घरात लपून बसणारे राज्यकर्ते या महाराष्ट्रात जन्माला यावेत हे या लढवय्या महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव म्हणावे लागेल. कोरोना या देशात कोणामुळे आला आणि कोणाच्या चुकीच्या धोरणांमुळे पसरला हे सर्व जनतेला ठाऊक आहे पण ज्यांच्यामुळे हे संकट आल ते आज मजेत आहेत. त्यांच्याकडे अफाट पैसा असल्याने त्यांना लॉकडाऊन चार महिनेच काय चार वर्ष चालला तरी फरक पडणार नाही पण जो गरीब माणूस आहे जो कारखान्यात, दुकानात खाजगी कंपनीत काम करणारा कर्मचारी आहे जो स्टेशनला किंवा मार्केट मध्ये हमाली करून पोट भरणारा आहे .जो फेरीवाला आहे, जो रिक्षावाला आहे, जो टॅक्सी वाला आहे त्याचा लॉक डाऊन मुळे रोजगार बुडाल्याने तो गेली चार महिने उपासमारीने मरतोय. घरात खायचे वांदे झाल्याने उपाशी पोराबाळांचे काळजाला भिडणारा आक्रोश तो बघू शकत नाही म्हणून मुलाबाळांची स्वतःच्या हाताने हत्या करून स्वतःही आत्महत्या करतोय तो आता हा लॉक डाऊन अधिक काळ सहन करू शकत नाही त्याला रस्त्यावर उतरून राडे करायला सरकारने भाग पाडू नये. सरकारने कोरोनाच्या भीतीने सार्वजनिक परिवहन सेवा बंद करून ठेवली आहे त्याचा सर्वाधिक फटका गोरगरिबांना बसतोय कारण काही ठिकाणी जे व्यापार उद्योग सुरू झालेत तिथपर्यंत लोकांना पोहचता येत नाही. लोकल ट्रेन ही तर मुंबईकरांची लाईफ लाईन पण साडेतीन महिन्याच्या नंतर ती फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी सुरू केली आहे पण त्यातही सरकारी आणि खाजगी अत्यावश्यक सेवा असा भेदभाव! त्यामुळे खाजगी दवाखाने खाजगी रुग्णालये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुंबईला जाणारे व्यापारी, तसेच जीवावर उदार होऊन बातम्यांचे कव्हरेज घेण्यासाठी सर्वत्र फिरणारे पत्रकार यांच्यासाठी मात्र लोकल सेवा बंद हा कुठला न्याय? आणि म्हणूनच काल नालासोपारा स्थानकात लोकांच्या संतापाचा बांध फुटला आणि लोक रस्त्यावर उतरले पण ही तर सुरुवात आहे यापुढेही लॉक डाऊन सुरूच राहिला आणि लोकल सेवा सर्वसामान्य जनतेसाठी बंदच ठेवण्याचा सरकारने निर्णय घेतला तर काल जे चित्र नालासोपारा रेल्वे स्थानकात बघायला मिळाले ते यापुढे सर्वच स्थानकांमध्ये बघायला मिळू शकते अशावेळी या जन प्रक्षोभाला रोखण्यासाठी सरकारकडे तेवढी यंत्रणा आहे का? म्हणूनच सरकारने आता तरी डोळे उघडावेत आणि लोकांचा विचार करूनच लॉक डाऊन बाबत निर्णय घ्यावा. लोकांनी आजवर लॉक डाऊन मधील सर्व नियम पाळले आहेत यापुढेही पाळतील कारण शेवटी प्रत्येकाला आपला जीव प्यारा आहे त्यामुळे कोरोना पासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्स असो, मास्क वापरणे असो की स्वच्छते बाबतचे नियम असोत लोक ते नियम पाळत आहेत. लोकल प्रवासासाठी सुद्धा असे नियम बनवा. लोक त्याच पालन करतील पण लोकल ट्रेन सुरु करा. कारण लोकल ट्रेन बंद असल्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून लोकांचे प्रचंड हाल सुरू आहेत बरे राज्यात फक्त कोरोनाचेच रुग्ण आहेत असे नाहीत तर ब्रेन, हार्ट, किडनी यासारख्या आजारांचे सुद्धा रुग्ण आहेत आणि त्यावर गोरगरीब माणूस के ई एम , जे जे यासारख्या सरकारी रुग्णालयात उपचार घेतो पण ट्रेन बंद असल्यामुळे या वसई, विरार, नालासोपारा, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर बेलापूर,पनवेल येथील रुग्णांना मुंबईत उपचारासाठी येता आले नाही त्यामुळे अनेकांचा घरातच तडफडून मृत्यू झाला याला जबाबदार कोण? भित्र्या राज्यकर्त्यांमुळे लोकांचा जीव जातोय म्हणूनच सार्वजनिक परिवहन सेवा सुरू करणे गरजेचे आहे.

रिपोर्टर

  • Editor
    Editor

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट