कल्याण-डोंबिवलीत कोरोना काळात डॉक्टर विरुद्ध राजकीय पक्ष

डोंबिवली(श्रीराम कांदू) कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता इथे राजकीय पक्ष विरुद्ध डॉक्टर असे वाद विवाद बघायला मिळत आहे अशीच घटना काही दिवसांपूर्वी वन रुपी क्लीनिकचे डॉक्टर राहूलघुले विरुद्ध मनसेची बघायला मिळालीआहे

दोन दिवसापूर्वी वन रुपीज क्लिनिकचे मालक संचालक राहूल घुले यांनी एका व्हिडिओद्वारे लोकांना आवाहन केले होते की राजकीय पक्ष किंवा त्यांच्या लोकांच्या मागे न लागता तुम्ही त्वरित आमच्याशी संपर्क साधा राजकीय पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे असा थेट आरोप त्यांनी त्या व्हिडिओ मार्फत केला होता वन रुपीज क्लिनिक द्वारे पाटीदार सभागृह आणि डोंबिवली येथील सावळाराम महाराज येथील बंदिस्त सभागृह मध्ये कोविड  सेंटर चालवले जाते त्यानंतर कल्याण-डोंबिवलीत त्याचे पडसाद उमटले होते त्याची गंभीर दखल घेत मनसे उपाध्यक्ष डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी डॉक्टर राहूल घुले यांना त्यांनी जाब विचारले होते आहे आणि जाहीर माफी मागावी असे ही सांगितले होते त्यानंतर डॉक्टर राहुल घुले याने दुसरा व्हिडिओ प्रसारित करून जर कोणत्याही राजकीय पक्ष किंवा इतर कोणी मंडळी माझ्या वक्तव्यावरुन दुखावला  असेल असा माझा उद्देश नव्हता अशी दिलगिरी व्यक्त केली त्यानंतर या वादावर पडदा पडला होता

मनसे चे आमदार राजू पाटील यांनी खाजगी ठेकेदार व पालिका प्रशासन रुग्णाची कशी लूट आणि हेळसांड करत आहेत याची टीका केली होती. विरोधात अपप्रचार करू नये अशी ताकीद आमदार राजू पाटील यांनी दिली होती

डोंबिवली शहरात भाजपा चे आमदार आणि वजनदार नेते रवींद्र चव्हाण पालिकेतील विरोधी पक्ष नेते राहुल दामले सभापती विकास म्हात्रे अशी दिग्गज मंडळी असून देखील याबाबत मौन बाळगून आहेत. फंडातून मिळालेल्या व्हेंटिलेटर धूळ खात पडून राहतात आणि गोरगरीब जनतेला सेवेपासून वंचित राहावे लागते... ही बाब गंभीर असून याबाबत मूग गिळून गप्प का ? अशी चर्चा संघ परिवार आणि समस्त डोंबिवलीकर करत आहेत

सेना भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजु असून सामान्य जनते च्या आरोग्याशी काही देणे घेणे नाही. गोरगरीब जनतेला गृहीत धरले आहे.

सेना भाजपा च्या कुरघोडीच्या राजकारणात समस्त कल्याण डोंबिवली कर भरडले जात आहेत याचं भान समस्त सेना भाजपा नेत्यांनी ठेवावे.

मनसे आमदार राजु पाटील यांची प्रतिक्रिया:चार महिने संयम ठेऊन सहकार्य केले.  पण....आता नाही  या लोकानी अर्थ कारण आणि राजकारण केलं. सामजिक बाधिलकी कुठेही जपली नाही यांना देव सुद्धा माफ करणार नाही अशी प्रतिक्रिया मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट