तब्बल चार महिन्यांनी लाल परी ग्रामीण भागात धावली
- by Adarsh Maharashtra
- Aug 05, 2020
- 1738 views
पालघर (जयेश शेलार/5 ऑगस्ट):कोरोना या संसर्गजन्य आजाराचा अधिक प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शासनाने पुकारलेल्या टाळेबंदीत प्रवासी वाहतूक करणारी बससेवाही बंद केली होती. गेल्या चार महिन्यांपासुन बंद करण्यात आलेली ग्रामीण भागातील बससेवा अखेर सुरू करण्यात आली आहे.
22 मार्च पासून करोनाच्या पाश्र्वभूमीवर नागरीकांच्या सुरक्षेसाठी खेडेगावात जाणा-या सर्वच भागातील बससेवा बंद करण्यात आल्या होत्या. सद्या प्रशासनाने ग्रामीण भागात टाळेबंदी शिथील केल्याने व ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी तसेच बाजार पेठेत जाण्यासाठी एसटी बसची नितांत गरज भासत होती. त्यामुळे बससेवा पुन्हा पुर्ववत सुरु झाल्याने प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बस आगारातून बाहेर पडताना व बाहेरून आल्या नंतर दोन वेळा धुवून घेतल्या जात आहेत. तालुक्यातील पिंपळास, अलमान, सापना, निशेत, पिंपरोली, दाभोन मांगरूळ, गारगाव, पिंपरोळी, चिंचपाडा या गावातील बस सेवा काही प्रमाणात सुरू करण्यात आल्या आहेत प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला तर आणखी फेऱ्या वाढविण्यात येतील अशी माहिती आगार व्यवस्थापक मधुकर धांगडा दिली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम