थकबाकीदारांच्या मुसक्या आवळणार - जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर

नाशिक जिल्हा बँक नाशिक जिल्ह्यातील ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र वेळोवेळी सांगूनही  बर्‍याच वर्षा पासुन थकीत कर्ज असणारे कर्जदार कर्ज भरण्यास तयार होत नाहीत. अशा कर्जदारांच्या मुसक्या आवळण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी दिली. 

जिल्हा बँकेकडे मार्च अखेर 2497 कोटी च्या ठेवी व 2900 कोटीचे कर्ज वाटप अशी आर्थीक स्थिती आहे. ठेवीदारांना मुलांच्या शिक्षणासाठी,मुलामुलींच्या लग्नासाठी, तसेच काहींना स्वताःच्या आजारणापासाठी पैशांची गरज आहे.ते सतत तगादा लावत आहेत. त्यांना त्यांच्या ठेवी अडचणीच्या वेळी देणे बँकेचेही कर्तव्य आहे. त्या ठेवी परत देण्यासाठीच आम्ही बर्‍याच वर्षा पासुन थकीत कर्ज असणार्‍या कर्जदारांच्या मुसक्या आवळण्याचा निर्णय घेतला आहे.  गेल्या दोन तीन वर्षातील थकीlत पीक कर्ज असलेल्या सामान्य शेतकर्‍यांना कोणताही त्रास दिला जात नाही.ज्यांचे कर्ज पाच लाखाच्या वर आहे. त्यांच्यावरच लक्ष्य केंद्रीत केले आहे असेही ते म्हणाले. 

ज्यांची एैपत आहे. तरीही ते दहा पंधरा वर्ष कर्ज भरत नाहीत. त्यांच्याच कडुन वसुली केली जाणार आहे.त्यातही त्यांनी 40 टक्के कर्ज भरले तरी उर्वरीत कर्जाचे पुर्नगठण करुन त्यांना दिलासा दिला जाणार आहे.सध्या बँक आर्थीक अडचणीत आहे.त्यामुळे त्यांनी कर्ज भरुन कारवाई टाळणे त्यांच्याच हिताचे आहे. वर्षानुवर्ष कर्ज थकवीणार्‍या साडेसहा हजार कर्ज दारांच्या मालमत्ता जप्तीचे दाखले बँकेने मिळवीले आहेत. त्यामुळे आगामी काळात त्यांच्यावर कारवाई झाल्या शिवाय राहणार नाही. 

 शेतकर्‍यांना शासनाचे जे अर्थ सहाय्य मिळाले आहे.त्यात बँकेचा कोणताही हस्तक्षेप नाही त्यांच्या रकमा त्यांना दिल्याच जाणार आहेत. सध्या एका आठवड्यात किमान पाच हजार रुपये काढावे असा आग्राह बँकेने धरला आहे.त्यामुळे अठवडा भरात पाच हजाराच्यावर रक्कम काढता येत नाही.मात्र याचा अर्थ तो पैसा अडवुन धरला असा होत नाही. साडेसहा हजार कर्जदारांकडुन थकीत कर्ज वसुली,साठी बँकेने तीनशे वसुली अधीकार्‍यांची फौज उभी केली आहे.या अधीकार्‍यांना काल  कायदेशीर धडक कारवाईचे प्रशिक्षण बँकेत देण्यात आले आहे.आगामी काळात ते अधीकारी कायदेशीर रित्या त्यांच्या मालमत्तांवर टाच आणुन वसुली करुन बँकेला पुर्वपदावर आणणार आहेत. असे व्यवस्थापकीय संचालक सतीश खरे यांनी सांगीतले.सद्यस्थितीत बँकेत 10 लाख 700 कोटींच्या ठेवी आहेत. या वर्षात 30 कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. मा. खा. देवीदास पिंगळे यांच्या आनंद ग्रेप ग्रोवर्स संस्थेकडे 2007 पासून 2 कोटी 27 लाख रूपयांची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी बँकेने कारवाई सुरू केली होती.मात्र  संस्था न्यायालयात गेली होती. न्यायालयाने लिलावाच्या प्रक्रियेची कागदपत्रे पुर्ण करण्यास परवानगी दिली. बँक या बाबत लवकरच कागदपत्रांची पुर्तता करणार असल्याचेही आहेर म्हणाले.

संबंधित पोस्ट