राज्य शासना कडुन उल्हासनगरच्या कोविड यौध्याना शिळ्या अन्नाची मेजवानी .
- by Rameshwar Gawai
- Sep 07, 2020
- 723 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरातील कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणन्या साठी लढणाऱ्या डॉक्टर व प्रशासकीय अधिकारी यांच्यासाठी जेवणाची पाकिटं व वस्तू सरकार कडून पुरवले जात आहे. मात्र या किटमध्ये येणारे अन्न, बिस्कीट, दुधपावडर व साहित्य निस्कृस्ट दर्जाचे असुन त्यांच्या वापराची मुदत संपलेली असल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात उघडकीस आला आहे. त्यामुळे शासनाकडून या कोविड यौध्याना निस्कृस्ट जेवण व साहित्याची रसद देऊन त्यांची सरकार उपेक्षा करतेय की काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.
उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात कोविड रुग्णालय, विलगी करण कक्षात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, वाँर्डबाँय, कर्मचारी यांच्यासाठी खिचडीचे व बिस्किट पाकिटं, दुधपावडर, यांचा साठा असणारा टेंपो क्रं एम एच १७ एजी ९४६६ मधून महापालिका आवारात आला. रविवारी सुट्टीच्या दिवशी आलेल्या खिचडीची बंद पाकीट, दूध पावडर ,बिस्कीट अशा वस्तूंनी भरलेला हा टेम्पो होता. महानगरपालिकेच्या आवारात मात्र भांडार विभागात जमा करण्यासाठी आलेले हे साहित्यातुन पत्रकारांच्या दक्षतेमुळे यातून उग्र वास येत असल्याचे जाणवले
सुरक्षा रक्षकांमार्फत यातील पाकिटांची तपासणी केली असता पाकीटात मुदत संपलेल्या खिचडी आणि बिस्कीट यांमधून किडे व घाणेरडा वास येत असल्याचे उघडकीस आले . या करिता टेम्पो चालकाकडे कोणतेही चलान अथवा कार्यादेश नसल्याने याबाबत गोंधळ उडाला.
उल्हासनगर मनसे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी याप्रकरणी पोलीस, प्रशासन व अन्न औषध विभागास तात्काळ तक्रारी करून हा टेंपो पोलिसांनी ताब्यात घेण्याची मागणी केली.
तर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार एका सेवाभावी संस्थेने महानगरपालिकेस शासनाच्या माध्यमातून ही मदत देऊ केली आहे अस सांगितल . मात्र शासन फुकट मदतीच्या नावाखाली देत असले तरी ते इतके निकृष्ट दर्जाचे असावे का हा प्रश्न स्थायी समिती सभापती राजेश वधारीया यांनी उपस्थित करीत सरकार वर निशाणा साधला आहे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम