निसर्ग प्रतिकूल असताना सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे डफली बजाव आंदोलन सर्वत्र यशस्वी

रायगड जिल्ह्यात आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

बोरघर / माणगांव: राज्यातील परिवहन व्यवस्था तथा एस. टी. महामंडळ ची बस सेवा सुरळीत करून राज्यातील वंचित, शोषित, गोरगरीब सर्व सामान्य जनतेचे दैनंदिन जीवन सुरळीत करावे या मागणी साठी वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली बुधवार दिनांक १२ आॅगस्ट २०२० रोजी दुपारी १२ वाजता हिंदी मोरभवन बस स्टाॅप, झांशी राणी चौक, नागपुर येथे डफली बजाओ आंदोलनाची सुरूवात झाली. 

आजचे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका स्तरावर करन्यात आले. ज्यामधे संपूर्ण राज्यात या आंदोलनाला जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी नागपुर येथे स्वतः उपस्थित राहून आंदोलनाचे नेतृत्व केले.

प्रसंगी जनतेला संबोधित करतांना बाळासाहेबांनी राज्य सरकार ला चांगलेच धारेवर धरले. महाराष्ट्र राज्य हे अगोदर दुसऱ्यांना निर्देशित करनारे राज्य होते पण आता हे दुसऱ्यांचे आदेश पाळनारे राज्य बनले आहे, सरकार प्राइवेट ट्रांसपोर्ट ला परवानगी देत आहे तर प्रायवेट ट्रांसपोर्ट मधील लोकांना कोरोना होत नाही मग सरकारी ट्रांसपोर्ट मधील लोकांनाच कोरोना कसा होनार हे शासनानं सांगावं असा घनाकाती प्रहार त्यांनी सरकारवर केला.     

आजचे आंदोलन हे फक्त सरकारला इशारा देन्यासाठी आहे, सरकारने राज्यातील जनजीवन सुरळीत केलं नाही तर १५ आॅगष्ट नंतर मोठ्या प्रमाणात आंदोलन करू असा इशारा सुध्दा यावेळी बाळासाहेबांनी सरकारला दिला.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात १२ आॅगस्ट रोजी निर्धारित केलेल्या या राज्य स्तरीय डफली बजाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात वंचितचे रायगड जिल्हा अध्यक्ष आयु विश्वतेज साळवी, तसेच वंचितचे रायगड जिल्हा महासचिव आयु सागर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली  त्या त्या ठिकाणच्या  वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. 

सदर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माणगांव बस स्थानकात तथा एसटी स्टॅण्डवर वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा अध्यक्ष विश्वतेज साळवी, महासचिव सागर भालेराव, श्रीवर्धन विधानसभा प्रभारी अध्यक्ष सिद्धार्थ भाई सोनावणे, जिल्हा सदस्य श्रीवर्धन विधानसभा उपप्रमुख शरद पवार, जिल्हा सदस्य किरण मोरे, जिल्हा सदस्य महेंद्र जाधव, जिल्हा सदस्य संजय घाग, माणगांव तालुका महासचिव रोहन साळवी, माणगांव शहर प्रमुख पृथ्वीराज खाडे, माणगांव तालुका उपाध्यक्ष देविदास जाधव, माणगांव तालुका उपाध्यक्ष संदीप जाधव, माणगांव तालुका उपाध्यक्ष मंदार मोरे, युवा अध्यक्ष प्रवीण जाधव, विळा विभाग अध्यक्ष सुधीर ओव्हाळ, युवा नेते कालवण विभाग नवनीत साळवी, साई विभाग मंदेश मोरे, माणगांव शहर रमेश माने, भारतीय बौद्ध महासभा माणगांव तालुका अध्यक्ष प्रबुद्ध जाधव, संदीप साळवी, राकेश साळवी, सुरेश आयरे, अभिषेक गायकवाड, महेश गायकवाड , कीर्ती साळवी, शैलेश मोरे, बबन साळवी, गोविंद साळवी, मंगेश साळवी, किरण साळवी, सुमन साळवी, उमाजी साळवी आणि संतोष साळवी इत्यादी वंचितच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन यशस्वी केले.

संबंधित पोस्ट