उल्हासनगर शहरात कोरोनाचा कहर सुरुच . कोरोनाग्रस्ताचा आकडा ३०२ वर .

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात कोरोनाचा कहर हा दिवसे दिवस वाढतच चालला असुन आता पर्यंत  कोरोना ग्रस्ताचा आकडा हा ३०२ वर पोहचल्याने नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे . तर जेवढे ही लोक क्वारंटाईन करतात त्यांचे बहुतेक चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने कोरोना ग्रस्तांचे आकडे वाढत चालले आहेत . त्यामुळे क्वारंटाईन करन्याचा आकडा कमी करुन संशयीतांचे स्वॅब घेवुन त्याना होम क्वारंटाईन केले तर कदाचित कोरोना ग्रस्तांचा आकडा कमी होवु शकतो . 

उल्हासनगर शहरात सुरवातील एक ही कोरोनाग्रस्त रुग्ण नव्हता . परंतु अचानकच या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संख्येत वाढ होत गेली आणि उल्हासनगर मधिल काही नगरे कोरोनाची हॉटस्पॉट झालीत . तेव्हा पासुन या रुग्णांचा ग्रॉफ कमी होत  नसल्याचे दिसुन येत आहे . तर दिवसे दिवस कोरोना ग्रस्तांचे आकडे वाढतच चालले आहेत . काल ३० लोकांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असुन हिराघाट कॅंप ३ येथिल एका वसाहती मध्ये एका तरुणाचा मृत्यु झाल्याने त्याच्या मयताला जमलेल्या लोकांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने १८ लोक कोरोनाग्रस्त झाले आहेत . तर कॅंप ३ येथिल संम्राट अशोक नगर मध्ये ४ जण पॉझिटिव्ह आले आहेत . असा एकंदरीत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आता ३०२ वर पोहचला आहे . दरम्यान ज्या ठिकाणी रुग्ण मिळतो त्या ठिकाणचे काही लोक क्वारंटाईन करतात . परंतु त्यांचे चाचणी अहवाल सरसकट पॉझिटिव्ह येत आहेत . मात्र या पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये कोरोनाचे कोणते ही लक्षणे आढळुन येत नाहीत . तेव्हा क्वारंटाईन करन्या करिता  कमी लोक घेवुन गेले तर रुग्णांची संख्या कमी होवु शकते . नाही तर होम क्वारंटाईन करुन त्याना घरा बाहेर पडु देवु नये असे प्रशासनाने ठरवायला हवे .

संबंधित पोस्ट