रचला नवा विक्रम; शेअर बाजार वधारला

शेअर बाजारात गेल्या अनेक दिवसांच्या तेजीनंतर मंगळवारी घसरण झाली होती, मात्र बुधवारी पुन्हा एकदा निर्देशांकाने उसळी घेतली. निर्देशांक विक्रमी संख्येवर पोहोचला तर निफ्टीही १२,००० वर पोहोचला, ११ जूननंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे.

मुंबई : शेअर बाजारात गेल्या अनेक दिवसांच्या तेजीनंतर मंगळवारी घसरण झाली होती. मात्र बुधवारी पुन्हा एकदा निर्देशांकाने उसळी घेतली. निदैशांक विक्रमी संख्येवर पोहोचला तर निफ्टीही १२,००० वर पोहोचला. ११ जूननंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका आणि चीनदरम्यानच्या व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर जगातल्या शेअर बाजारांमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. दुपारच्या व्यवहारांमध्ये निर्देशांक ४०,५०० अंक पार करून गेला तर निफ्टीची घोडदौडही १२,००० अंकांच्या जवळपास राहिली.

मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की आता आर्थिक सुधारणा होण्यास विलंब लागणार नाही. मागील वर्षांमध्ये राज्यसभेत संख्याबळ कमी असल्याने अनेक आर्थिक सुधारणा लागू होण्यास विलंब झाला. यंदा हे काम सोपे होईल.
 उघडला तेव्हा संमिश्र प्रतिसाद होता. सेन्सेक्समध्ये थोडी तेजी तर निफ्टीत थोडीशी घसरण पाहायला मिळाली.शेअर बाजारयाव्यतिरिक्त आयसीआयसीआय बँकेचे शेअर्सदेखील ४८०.७० अंकांनी वधारले आहेत. बँकेचे समभाग नफ्यात आहेत. बुधवारी सकाळी 

निर्देशांक २२१.५५ अंकांच्या वाढीसह ४०,४६९.७८ वर बंद झाला तर निफ्टी ४८.८५ पॉइंट्सने वधारून ११,९६६.०५ वर बंद झाला. इन्फोसिसच्या समभागांमध्ये सर्वात जास्त वाढ पाहायला मिळाली. मुंबई स्टॉक एक्स्चेंजमध्ये यात २.५ टक्के वाढ दिसून आली. 'इन्फोसिसचे आकडे तर देवही बदलू शकत नाही,' असं इन्फोसिसचे अध्यक्ष नंदन नीलकेणी यांनी व्हिसलब्लोअर कंपनीला प्रत्युत्तर देताना म्हटलं होतं. व्हिसलब्लोअरने इन्फोसिसवर गंभीर आरोप केले होते.


संबंधित पोस्ट