कर्जतसह नेरळमधे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जंयती विविध उपक्रमाने साजरी; सर्वपक्षीय नेत्यांचीही उपस्थिती!

कर्जत- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुकुक्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जंयती विविध उपक्रमाने साजरी झाली, नेरळ शहरातही “बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा” वतीने विविध स्तुत्य उपक्रम राबवून बाळासाहेबांची जंयती साजरी करण्यात आली. तर तालुक्यांत विविध ठिकाणी विविध उपक्रमाने बाळासाहेब ठाकरे यांची जंयती साजरी झाली आहे. 

कर्जत तालुक्यांतील विविध ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जंयती साजरी झाली, कर्जत तालुक्यांत ठिकठिकणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा अभिवादनाचे बॅनर मोठ्या संख्येवर लावणेत आले होते. कर्जत तालुक्यांतील नेरळ येथिल बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख प्रभाकर देशमुख यांनी आणि कार्यकर्त्यांनी तर नेरळ शहरात विविध कार्यक्रम साजरे केले आहेत. आज सकाळीच नेरळ शहरातील बाजारपेठोतील शिवाजी चौकात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा वतीने नेरळ शहरातील कन्या शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य वाटप केले, तसेच सरकारी रुग्णालयात फले वाटपाचा कार्यक्रम करणेत आला आहे. 

या प्रसंगी बाळासाहेब शिवसेनेचे नेरळ शहरप्रमुख प्रभाकरजी देशमुख यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडुन आयोजित कार्यक्रमास राजिपचे माजी अध्यक्ष सुरेशदादा टोकरे, भाजपाचे कर्जत तालुकाअध्यक्ष मंगेशदादा म्हसकर, रिपाइंचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख तथा पत्रकार धर्मानंद गायकवाड, नेरळचा सरपंच सौ, उषाताई पारधी, नेरळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, सपोनि हनुमंत शिंदे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते गजुभाई वाघेश्वर, अंकुश दाभणे, अंकुश उर्फ पप्पू शेळके, जयवंत साळुंखे, किसन शिंदे, सुरेश राणे, माजी सरपंच जान्हवी साळुंखे, मनोज मानकामे, सचिन खडे, ग्रामपंचायतीचा सदस्या जयश्री मानकामे, गीतांजली देशमुख, उमाताई खडे, शिवाली पोतदार यासंह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी, महीला पदाधिकाऱ्यांसह सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणेसाठी येथे उपस्थितीती लावली होती. 

दरम्यान यावेळी पाहुण्यांचा हस्ते दिपप्रज्वलन करुन या कार्यक्रमाची सुरुवात करणेत आली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस राजिपचे माजी अध्यक्ष सुरेशदादा टोकरे यांनी पुष्पहार अर्पण करुन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना उपस्थितीतांना अभिवादन केले, या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नेरळ विद्या मंदीरचे शिक्षक संजय शिंदे यांनी केले, तर आलेल्या पाहुण्यांचे स्वागत बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेरळ शहरप्रमुख प्रभाकर देशमुख यांनी केले.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट