कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या प्रारुप मतदार यादीत!16 हजार 82 स्त्री आणि 14 हजार 80 पुरुष मतदार!

रायगड(धर्मानंद गायकवाड)- कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या तयार करण्याबाबतच्या कार्यक्रमांतर्गत प्रारुप मतदार याद्या बुधवार दि. 23 नोव्हेंबर  रोजी  प्रसिध्द करण्यात आल्या.  या प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप याद्यांमध्ये एकूण  30 हजार 162 मतदार असून त्यापैकी 16 हजार 82 स्त्रीया आणि 14 हजार 80 पुरुष मतदार असल्याची माहिती कोकण विभागाचे   उप आयुक्त (सामान्य प्रशासन) श्री. मनोज रानडे यांनी दिली.

मा. भारत निवडणूक अयोगाकडून कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम दि. 1 ऑक्टोबर 2022 ते 30 डिसेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येत असून, मतदार नोंदणी नियम 1960 मधील नियम 10 नुसार कोकण विभाग मतदार संघातील प्रारुप मतदार याद्या व नोटीस 5 बुधवार  दि. 23 नोव्हेंबर  रोजी प्रसिध्द करण्यात आली. या प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप याद्यांमध्ये एकूण  30 हजार 162 मतदार असून त्यापैकी 16 हजार 82 स्त्रीया आणि 14 हजार 80 पुरुष मतदार आहेत.

ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आता दि. 23 नोव्हेंबर पासून प्रारुप मतदार याद्या मतदारांना तपासणीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या असून, दि. 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रसिध्द झालेल्या मतदार याद्यांवरील दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. मतदार याद्यांवरील दावे व हरकती कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय, कोकण भवन, सीबीडी बेलापूर तसेच जिल्हाधिकारी तथा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग यांची कार्यालये व संबंधित जिल्ह्यातील इतर पदनिर्देशित अधिकारी यांची कार्यालये या ठिकाणी स्वीकारण्यात येणार आहेत. मतदारांनी संबंधित कार्यालयांमध्ये जाऊन आपले दावे व हरकती नोंदवाव्या असे आवाहन कोकण विभागाचे उप आयुक्त (सामान्य प्रशासन) श्री. मनोज रानडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

संबंधित पोस्ट