कर्जत खालापुर विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी किशोर गायकवाड ! रिपाइंत प्रचंड उत्साहाचे वातावरण!

कर्जत- रायगड जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया (आठवले) पक्षाचा कर्जत खालापुर विधानसभा मतदार संघाचा अध्यक्षपदी डिकसल शांतीनगर येथिल किशोर अप्पाजी गायकवाड यांची नियुक्ती करणेत आली आहे. रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीयाचे रायगड जिल्ह्याचे जिल्हाअध्यक्ष नरेंद्र चंद्रकांत गायकवाड व रायगड जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड यांनी ही नियुक्ती केली आहे. केंदिय मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदासजी आठवले यांच्या आशिर्वादाने ही निवड करणेत आली आहे. त्यामुळे कर्जत खालापुर विधानसभा मतदारसंघात  किशोर गायकवाड यांच्या निवडीने कार्यकर्त्यामधे प्रंचड उत्साहाचे वातावरण पसरले आहे. 

रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापुरात रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया (आठवले) गटांची प्रंचड ताकद आहे, त्यामुळे या विधानसभा मतदार संघात विविध नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायतीचा सदस्य रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया (आठवले) गटाचे आहेत. डिकसल येथिल किशोर गायकवाड हे अनेक वर्ष आरपीआय पक्षाचे काम करीत आहेत, त्यातच किशोर गायकवाड यांनी रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडियाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्रजी गायकवाड यांच्याकडे, तसेच रायगड जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड यांच्याकडे कर्जत खालापुर विधानसभा मतदार संघ अध्यक्षपदावर काम करणेची संधी मिळणेबाबत विनंती केली होती, त्यानुसार जिल्हा अध्यक्ष आणि संपर्क प्रमुख यांनी विचारविनिमय करुन आज किशोर अप्पाजी गायकवाड यांची कर्जत खालापुर विधानसभा अध्यक्ष पदी निवड केली आहे,

रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापुर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्षपदी किशोर गायकवाड यांची निवड झाल्याने त्यांचे कर्जत खालापुर मधील रिपाइं (आठवले) पक्षाचा कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आसुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत, दरम्यान पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे सोने करणार असल्याचे मत यावेळि किशोर गायकवाड यांनी व्यक्त केले आसुन अधिकाधिक पक्ष वाढविणेसाठी मेहनत घेणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट