उल्हासनगर येथिल मध्यवर्ती रुग्णालयाच्या हलगर्जी पणा मुळे महिलेचा मृत्यु .
- by Rameshwar Gawai
- Jun 25, 2020
- 3558 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर येथिल मध्यवर्ती रुग्णालय हे दिवसे दिवस वादाच्या भोवऱ्यात सापडत चालले आहे . या रुग्णालयात कोणत्या ही सुविधा नसल्याने रुग्ण रोज दगावत आहेत . काल एका महिलेला श्वसनाचा त्रास झाल्याने तिला या रुग्णालयात उपचारा करिता दाखल केले परंतु व्हेंटिलेटर ची सुविधा नसल्याने त्या महिलेला ऑक्सीजन शिवाय कोणते ही उपचार मिळाले नाहीत त्यामुळे त्या महिलेचा मृत्यु झाला आहे .
उल्हासनगर कॅंप ३ येथिल संम्राट अशोक नगर येथे राहणाऱ्या मीनाबाई बाळु कदम याना २४ जुन रोजी दुपारी श्वसनाचा त्रास होवु लागला . तेव्हा त्याना त्याचे पती व मुलाने शिवनेरी हॉस्पिटल . रामरक्षा हॉस्पिटल येथे नेले परंतु या दोन्ही हॉस्पिटल नी त्याना उपचारा करिता दाखल करुन घेन्यास नकार दिला तेव्हा अखेर हतबल होवुन त्यानी मिनाबाई याना मध्यवर्ती रुग्णालयात घेवुन गेले . तेथे सुध्दा हो नाही हो नाही करुन कसे तरी दाखल केले . डॉक्टरानी त्याना ऑक्सिजन लावले . त्या व्यतिरिक्त कोणते ही उपचार केले नाही . दरम्यान त्याना व्हेंटिलेटर ची आवश्यकता असताना त्याना व्हेंटिलेटर लावन्यात आले नाही . त्यामुळे सकाळी अकरा वाजता त्यांचा मृत्यु झाला . जर मध्यवर्ती रुग्णालयात व्हेंटिलेटर असते तर त्यांचा जीव वाचला असता . मात्र मध्यवर्ती रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारा मुळे रुग्णाना चांगले उपचारच मिळत नाहीत .अशीच रेड क्रास हॉस्पिटल ची अवस्था आहे . त्या ठिकाणी सौम्य लक्षणे असणाऱ्याचे स्वॅब घेवुन तेथेच दाखल करतात परंतु तेथे कोणते ही उपचार होत नाहीत . अशीच अवस्था सर्व कोविड रुग्णालयाची आहे . जर या सर्व रुग्णालयाची अवस्था प्रशासनाने सुधारली नाही तर रेड क्रास हॉस्पिटल च्या प्रवेश द्वारावरच उपोषण करन्याचा इशारा अशोका फाऊंडेशन चे अध्यक्ष शिवाजी रगडे यानी दिला आहे . तर मध्यवर्ती रुग्णालयाच्या या गलथान कारभारावर शासनाने लक्ष दिले पाहिजे . अशी मांगणी रुग्णांच्या नातेवाईकानी केली आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम