उल्हासनगर . अंबरनाथ मध्ये लॉकडाऊन असतानाही मटक्याचे धंदे जोरात सुरु .

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर अंबरनाथ या दोन्ही शहरात कोरोना महामारीच्या प्रार्श्वभुमीवर लॉकडाऊन सुरु आहे . तर लोकाना रस्त्यावर फिरण्यास मनाई असताना सुध्दा उल्हासनगर व अंबरनाथ या दोन्ही शहरात मटक्याचे धंदे मात्र बिनधास्त पणे सुरु असुन या मटक्याच्या धंद्यावर कोणते ही नियम अथवा फिजिकल डिस्टंसिंग पाळण्यात येत नसुन मटका लावणारे गर्दी करताना दिसत आहेत . पोलिस मात्र या धंद्याकडे अजिबात लक्ष देत नसल्याने या मटके वाल्यांची मस्त गटारी साजरी होत आहे . 

उल्हासनगर व अंबरनाथ या दोन्ही शहरात कोरोना महामारी मुळे लॉकडाऊन आहे . तरी पण दोन्ही शहरात रोजच पॉझिटिव्ह रुग्ण मिळुन येत आहे . असा कडक लॉक डाऊन असताना सुध्दा उल्हासनगर शहरातील कॅंप ३ येथिल  १७ सेक्सन मध्ये मामु मटके वाल्याचा मुलगा हा बिनधास्त पणे मटका चालवत आहे . हा मटका मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येत आहे . तर शहाड फाटक येथील ब्रिज च्या खाली  छोटु सावंत यांचा मटक्याचा धंदा जोरात सुरु आहे . तर कॅंप २ येथिल फकलमंडळी खेमाणी येथे शंकर नावाचा इसम हा मटक्याचा धंदा जोरात चालवत आहे . तर हे दोन्ही मटक्याचे धंदे हे उल्हासनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चालत असुन पोलिस या धंद्यावर कोणती ही कारवाई करत नाहीत . 

दरम्यान अंबरनाथ पश्चिम येथिल रेल्वे स्थानका समोर अक्षय बार च्या पाठीमागे अब्दुल व बाबु नावाचे इसम खुले आम मटक्याचे धंदे करत असुन बाजुलाच बांगळी गल्ली असल्याने तेथे लोकांची अधिक वर्दळ असते . तेव्हा अब्दुल व बाबु यांचा मटका जोरात सुरु आहे . हा अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्याच्या  हद्दीत सुरु असुन पोलिस या मटक्या कडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे . दरम्यान उल्हासनगर व अंबरनाथ या दोन्ही शहरात लॉक डाऊन आहे त्यामुळे नागरिकांचे कामधंदे बंद आहेत तरी पण मटका खेळन्या साठी लोक येत आहेत . तर हे मटका किंग बिनधास्त पणे मटक्याचे धंदे चालवुन गोर गरीबांचा संसार उध्वस्त करत आहेत . दरम्यान या दोन्ही शहरात मटक्याचे धंदे चालत असताना पोलिस मात्र या धंद्याकडे दुर्लक्ष करुन या मटक्या वाल्याना मोकळीक देत आहेत . तर या दोन्ही शहरातील मटक्यावाल्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मांगणी काही सामाजिक संघटना करत आहेत .

संबंधित पोस्ट