
राज्यभरात वाहन विक्रेत्यांकडून डेपो-लॅाजिस्टिक चार्जेसच्या नावाखाली होणाऱ्या आर्थिक लूटमारीविरोधात शिव वाहतूक सेनेचा लढा !
- by Ketan khedekar
- Aug 11, 2022
- 267 views
मुंबई : संपुर्ण राज्यभरात वाहन खरेदी करताना वाहन विक्रेत्यांमार्फत (डिलर्स) खरेदीदारांकडून डेपो, लॅाजिस्टिक किंवा हॅन्डलिंग शुल्क आकारणीच्या नावाखाली होणाऱ्या आर्थिक लूटमारीसंदर्भात शिवसेनेच्या शिव वाहतूक सेनेने आज राज्याचे परिवहन आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन वाहतूकदारांच्या विविध मागण्यांबाबत निवेदन दिले.
याशिवाय राज्यातील प्रत्येक परिवहन कार्यालयात मिळणाऱ्या सर्व सेवा तसेच त्याकरीता लागणारे शुल्क आणि कालावधी दर्शविणारे माहितीफलक लावणे, आरटीओ अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामकाज वेळेत मोठ्या प्रमाणावर असलेली अनुपस्थिती, वाहन नोंदणी आणि पासिंगवेळी होणाऱ्या गैरव्यवहारांबाबत नागरिकांच्या तक्रारी, वाहन योग्यता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ॲानलाईन प्रक्रियेद्वारे लागणारा विलंब, रॅपिडो-उबर ॲपमार्फत दुचाकी वाहनांद्वारे बेकायदेशीरपणे सुरू असलेली प्रवासी वाहतूक परिणामी प्रवाशांची धोक्यात येणारी सुरक्षितता रिक्षा-टॅक्सी वाहनचालकांच्या व्यवसायावर येणारे संकट, महाराष्ट्रात वाहन उत्पादन कंपन्यामार्फत वाहनासोबत देण्यात येणारी माहितीपुस्तिका ही मराठी भाषेत देखील उपलब्ध व्हावी या विविध मुद्दयांवर यावेळी विस्ताराने चर्चा करण्यात आली.
आयुक्तांसमवेतच्या चर्चेत शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष मोहन गोयल, सरचिटणीस निलेश भोसले, कोषाध्यक्ष विनय मोरे आणि उपाध्यक्ष साजीद सुपारीवाला सहभागी झाले होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम