20 वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला मुलगा थेट हत्या प्रकरणात ताब्यात घेतल्यावरच भेटला

हा तरुण 20 वर्षांपूर्वी गाव सोडून मुंबईत आल्याचं पोलीस तपासात उघड झालं.

ठाणे (प्रतिनिधी): ठाण्यात एक फिल्मी स्टाईल प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी हत्येच्या गुन्हात चौकशीसाठी ताब्यात घेतलेला एक तरुण त्या हत्याप्रकरणात निर्दोष निघाला. पण त्याचवेळी त्या तरुणाबाबतचं एक महत्त्वाचं सत्य पोलिसांच्या हाती लागलं. हत्या प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतलेला हा तरुण 20 वर्षांपूर्वी गाव सोडून मुंबईत आल्याचं पोलीस तपासात उघड झालं.

कळवा येथील औषधालयात काही दिवसांपूर्वी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांकडून सुरू आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पडताळणी तसेच खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हत्या प्रकरणातील संशयीत आरोपी हा मुंबईतील माहीम दर्गा भागात राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांनी आरोपीचा माहीम दर्गा इथं शोध घेतला. मात्र, तो त्याठिकाणी आढळला नाही. त्यानंतर हा संशयीत आरोपी वांद्रे येथील उड्डाणपुलाखाली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वांद्रे उड्डाणपुलाखालून पोलिसांनी संशयीत आरोपीला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याचे नाव मोहम्मद अहमद असल्याचे कळले. खूनामध्ये त्याचा कोणताही संबंध नसल्याचेही उघड झाले.                              
या खून प्रकरणाचा शोध घेत असताना ठाणे पोलिसांसमोर एक नवीनच माहिती आली. मोहम्मद अहमद हा उत्तर प्रदेशच्या एका गावातून 20 वर्षांपूर्वी पळून मुंबईत आला होता. पोलिसांनी त्याच्या घरच्यांशी संपर्क साधला. याबाबतचा खुलासा होताच पोलिसांना मोहम्मदचा भाऊ मुंबईतील गोवंडी भागात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या भावाशी संपर्क साधून मोहम्मदला त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. त्यामुळे एका खून प्रकरणाच्या तपासादरम्यान 20 वर्षांपूर्वी घरापासून दूर गेले मुलगा पुन्हा त्या कुटुंबाला मिळाला.या खून प्रकरणाचा शोध घेत असताना ठाणे पोलिसांसमोर एक नवीनच माहिती आली. मोहम्मद अहमद हा उत्तर प्रदेशच्या एका गावातून 20 वर्षांपूर्वी पळून मुंबईत आला होता. पोलिसांनी त्याच्या घरच्यांशी संपर्क साधला. याबाबतचा खुलासा होताच पोलिसांना मोहम्मदचा भाऊ मुंबईतील गोवंडी भागात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या भावाशी संपर्क साधून मोहम्मदला त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. त्यामुळे एका खून प्रकरणाच्या तपासादरम्यान 20 वर्षांपूर्वी घरापासून दूर गेले मुलगा पुन्हा त्या कुटुंबाला मिळाला.

संबंधित पोस्ट