बेकायदेशीर सावकार पोलिसांच्या राडारवर?
- by Adarsh Maharashtra
- Aug 20, 2020
- 3929 views
विरार(दीपक शिरवडकर) - कोरोनामुळे सकाळी कमावणारे व रात्री खाणारे हात बांधले गेले आहेत. एक वेळच्या जेवणाची ददात असणारे सर्वसामान्य गरीब-मध्यम वर्गीय गल्लीबोळातील बेकायदा सावकारां कडे हात पसरत आहेत. व्याजाने पैसे घेत आहेत. सद्य:स्थितीत असे सावकार कर्ज घेतले त्यांच्या मागे तगादा लावत आहेत. कर्जबाजारीपणामुळे काहींनी आत्महत्याही केल्या आहेत. आता अशा बेकायदा सावकारांच्या मुसक्या आवळण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सरसावले आहेत.
पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकत बेकायदा सावकारांवर लक्ष केंद्रित केले आहे पत्राशेड मध्ये राहणारी मंडळी लाखो रुपये कर्जाने कसे काय देऊ शकतात?बेहिशेबी संपत्ती कशी निर्माण करतात?कधी काळी खायचे वांदे असणारी मंडळी कामधंदा नसणारे दहा-दहा सदनिका, चार चाकी दुचाकी गाड्या, भूखंड,सुवर्णालंकार व अन्य लक्झरी वस्तू कशा काय घेऊ शकतात याचा तपास पोलीस करत आहेत. बेकायदा सावकारांना पडद्यामागून काळा पैसा पुरविणाऱ्या फायनान्सरांचाही शोध घेतला जात आहे. लवकरच अशा बेकायदा सावकारांवर छापे टाकले जाण्याची शक्यता पोलीस वर्तुळात वर्तवली जात आहे. काही ठिकाणी "भिशी"च्या नावाखाली ही बेकायदा सावकारी होत असल्याने त्यावरही पोलिसांची करडी नजर असल्याचे सूत्रांनी सांगितले.बेकायदा सावकारांना पडद्यामागून काळा पैसा पुरविणारे फायनान्सर समाजात उजळ माथ्याने प्रतिष्ठितपणाचा आव आणत फिरत आहेत. त्यांनाही पोलिसांच्या अनेक यंत्रणानी आपल्या राडारवर घेतले असल्याचे समजते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम