घोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्धविहार जिर्णोध्दार व बुद्ध रुपाची प्रतिष्ठापना


घोडेगाव : घोडेगाव बौद्ध वस्ती येथे बौद्ध पौर्णिमेनिमित्त बौद्धविहार जीर्णोद्धार व बुद्ध रूपाची प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम  पार पडला. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सामूहिक वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी बौद्धविहाराचे उद्घाटन पोलीस उपायुक्त डॉ. श्रीप्रकाश मारुती वाघमारे व त्यांच्या पत्नी डॉ. स्वाती वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना करून दीपप्रज्वलन घोडेगावचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आचार्य महादेव वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. हा सर्व कार्यक्रम मास्क व सॅनिटायझरचा वापर करून शासनाच्या नियमांचे पालन करत पार पडला. या वेळी रमाबाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुनंदा वाघमारे, सुनील वाघमारे, राजू वाघमारे, दीपक वाघमारे , जितेंद्र वाघमारे, किशोर वाघमारे उपस्थित होते .

रिपोर्टर

संबंधित पोस्ट