मुंबई विद्यापिठातील कामगारांना मिळाला न्याय कामगारांनी मानले कामगारनेते मिलिंद तुळसकर यांचे आभार

मुंबई : मुंबई विद्यापिठातील कामगारांना गेल्या २० वर्षांपासून सामान काम सामान वेतन  मिळत नसून त्यांची फार पिळवणूक होत होती. याबाबत  येथील कामगारांनी २०१४ साली कामगारांनी कामगार नेते मिलिंद  तुळसकर यांची भेट घेऊन त्यांना हि समस्या सांगितली. यावर ताबडतोब मिलिंद तुळसकर यांनी मुंबई विद्यापीठ कामगार संघटनेची स्थापना करून त्यांनी हा लढा दिला. त्यानंतर त्यांनी विविध आंदोलन करून तसेच कोर्ट कचेऱ्या करून त्यांनी मुंबई हाय कोर्टामार्फत या सर्व कामगारांना समान काम समान वेतन हा कायदा लागू करून घेतला. तसेच या अस्थायी स्वरूपात काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी करून त्यांना अगदी पहिल्या महिन्यापासूनचा प्रोविडेंट फंड देखील मिळवून दिला. मुंबई विद्यापीठाने २००९ पासून कामगारांचा प्रोविडेंट फंड देखील कापला नव्हता. यामुळे भविष्य निर्वाह निधी मुंबई  कार्यालयाने २५  देखील ठोठावला.  यामुळे मुंबई विद्यापीठाला १६ कोटी रुपयांची प्रोविडेंट फंडची रक्कम या कामगारांना द्यावी लागली. हि मुंबई विद्यापीठासारख्या शिक्षण संस्थेला फार मोठी लाजिरवाणी  गोष्ट आहे. 

मी गेले अनेक वर्षे कामगारांचे प्रश्न सोडवत असून त्यासाठी अनेक लढे दिले आहेत. मुंबई विद्यापिठातील कामगारांना मी त्यांचा हक्क मिळवून देऊन त्यांना कायमस्वरूपी केले याबाबत मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो. यापुढे देखील कामगारांनी जागरूक राहिले पाहिजे आणि व्यवस्थापना विरुद्ध आवाज उचलून आपला हक्क मिळवला पाहिजे. जे कोणी कामगार असतील आणि त्यांची व्यवस्थापनाद्वारे पिळवणूक होत त्यांनी मला  साधावा मी नक्कीच त्यांना मदत करून त्यांचा हक्क मिळवून देईल अशी माहिती अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष कामगार नेते मिलिंद तुळसकर यांनी दिली.

संबंधित पोस्ट