प्रेक्षकांच्या अभूतपूर्व गर्दीत राष्ट्र राष्ट्रपित्याला आदरांजली

मुंबई:महात्मा गांधी यांच्या १५३ व्या जयंती निमित्त पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी तर्फे काल रविवार, दिनांक २ ऑक्टोबर २०२२ रोजी सायं ४ वाजता अकादमीच्या मिनी थिएटर मध्ये पु ल कट्टाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इफ्टा आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी निर्मित/प्रस्तुत आण्णाभाऊ साठे लिखित आणि शिवदास घोडके दिग्दर्शित "मुंबई कोणाची?" हे लोकनाट्य सादर करण्यात आले. यावेळी सुलभा आर्या, सिध्दार्थ प्रतिभावंत, दीपाली बडेकर, मनोज चिताडे, निखिल राठोड, सबुद्ध, नारायण सोनकांबळे, रेणुका धावले, सुशांत,आकाश, सुमित, आशुतोष देशमुख, मयूर इत्यादी कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. धम्मरक्षित रणदिवे यांचे संगीत,  एम. एस. सत्थू यांचे नेपथ्य,  अनिल सुतार यांचे नृत्य दिग्दर्शन,  अविनाश कुमार यांची प्रकाश योजना  या नाटकाच्या आधिक जमेच्या बाजू होत्या.   तसेच सायं ६.४५ वा. भद्रकाली, मुंबई यांचे "गांधी नावाचा महातारा" हा महात्मा गांधीच्या जीवनावर आधारित कवितांचा अभ्यासपूर्ण कार्यक्रम  सादर करण्यात आला. 

यावेळी कवी दीपक कांबळी व कवी विनय शिर्के यांनी गांधीजींच्या जीवन चरित्रावर आधारित स्वलिखित कवितांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना किरण वालावलकर यांनी गांधीजींचा जीवन प्रवास प्रेक्षकांसमोर मोठ्या कौशल्याने उभा केला. हे दोन्ही कार्यक्रम हाऊसफुल्ल करून प्रेक्षकांनी एक प्रकारे राष्ट्रपिता महात्माजींनी आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना पु ल अकादमीचे प्रकल्प संचालक, संतोष रोकडे यांनी "येत्या पु ल  कट्टयात आपली कला सादर करण्यासाठी समन्वयक राकेश तळगावकर  यांच्याशी 8652201870 या क्रमांकावर संपर्क करावा" असे आवाहन महाराष्ट्रातील तमाम हौशी व नवोदित कलाकारांना  केले आहे.

संबंधित पोस्ट