कोरोना विषाणू मुक्तीच्या लढाईत पोलीस हवालदार दिपक हाटे शहिद झाल्यामुळे माणगांवसह संपूर्ण गोरेगांवात शोककळा

बोरघर/माणगांव :कोरोना विषाणू मुक्तीच्या राष्ट्रीय लढाईत रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्याच्या गोरेगांव विभागातील नागावचे सुपुत्र एक कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पोलीस हवालदार दिपक जयराम हाटे हे मुंबई बांद्रा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार ऑडरली या अत्यंत जोखमीच्या पदावर कार्यरत होते. त्यांचे कोरोना विषाणू मुक्तीच्या राष्ट्रीय लढाईत शुक्रवार दिनांक २९ मे २०२० रोजी निधन झाले. कोरोना विषाणू मुक्तीच्या राष्ट्रीय लढाईत त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे ते मुबंई येथील नायर रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतल्यावर त्यांचा मृत्यू झाला. 

 काळकथीत पोलीस हवालदार दीपक हाटे रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्याच्या गोरेगांव विभागातील नागाव या गावचे सुपुत्र होते. त्यांच्या या अकाली निधनानंतर संपूर्ण नागांव गावावर, गोरेगांव विभागावर आणि संपूर्ण माणगांव तालुक्यावर दुःखाची शोककला पसरली असून. संपूर्ण गोरेगाव परिसर दुःखामध्ये बुडाला आहे. त्यांच्या अशा अकाली जाण्याने पोलीस खात्यासह बौद्ध समाजाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. 

 काळकथीत पोलीस हवालदार दीपक हाटे बांद्रा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार ऑडरली या पदावर कार्यरत होते. ते वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या अगदी जवळचे सहकारी होते. पोलीस स्टेशन मध्ये ऑर्डरली या पदावर कार्यरत असताना त्यांनी पोलीस खात्यातील अत्यंत महत्त्वाच्या जबाबदार्या प्रामाणिकपणे निभावल्या आहेत. कर्तव्यात कधीही कसूर न करता नेहमी कर्तव्य तत्पर असलेले नेहमी सर्वांशी हसून खेळून वागणारे दिपक हाटे हे पोलीस खात्यातील सर्वांचे आवडते व्यक्तीमत्व होते. ते सुरवातीला मुंबई येथील मलबार हिल पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. 

 काळकथीत पोलीस हवालदार दिपक जयराम हाटे यांच्या निधनाची दुःखद वार्ता सोशल मीडियाच्या आणि सामाजिक माध्यमातून समजल्यावर सर्वांना अतीव दुःख झाले. त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस सहकारी,  मित्र परिवार, हितचिंतक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तर त्यांचे आप्तेष्ट आणि  नागाव हितवर्धक स्थानिक व मुबंई या भावकीचे पदाधिकारी, गोरेगांव विभागातील सर्व शाखांचे पदाधिकारी, माणगांव तालुक्यातील सर्व सामाजिक व धार्मिक संघटनांचे आजी माजी, विद्यमान पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी अत्यंत दुःखद आणि जड अंत करणाने  आपल्या लाडक्या भावाला शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्याच प्रमाणे गोरेगाव विभाग पंचशील बौद्धजण सेवा संघ अध्यक्ष तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्र शास्त्र विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव, सामाजिक कार्यकर्ते विकासदादा गायकवाड, विश्वस्त अशोक साळवी, संदीप साळवी, चंद्रमणी साळवी, दिलीप साळवी, त्यांचे भाऊ सुभाष हाटे, बिपीन हाटे, श्रीकांत हाटे, बबन हाटे, तसेच सर्व स्थानिक व मुबंईकर पदाधिकारी यांनी शहीद कोवीड योद्धा दीपक जयराम हाटे या लाडक्या भावाला श्रद्धांजली वाहिली.

संबंधित पोस्ट