दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे पं. जितेंद्र अभिषेकी यांची मैफिल

मुंबई:      दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने ‘स्वरसंचित’ या शीर्षकाअंतर्गत दर महिन्याला एका विख्यात गायक कलाकाराची ध्वनिमुद्रित मैफील प्रसारित करण्यात येते.  रविवार दिनांक

२० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजल्यापासून पं. कै. जितेंद्र अभिषेकी यांची मैफिल केंद्राच्या यूट्यूब चॅनलवरून सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा रसिकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

अत्रौली घराण्याचे गुल्लूभाई जसदनवालाआग्रा घराण्याचे पं. जगन्नाथबुवा पुरोहितउस्ताद अजमल हुसेन खॅां यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. नंतर त्यांनी स्वतःची विशिष्ट शैली निर्माण केली. शास्त्रीय संगीतउपशास्त्रीय संगीतभक्तीसंगीतनाट्यसंगीत या गायनप्रकारात ते रसिकांची दाद मिळवत. संगीतकार म्हणूनही त्यांनी नावलौकिक मिळवला. त्यांनी अनेक शिष्य तयार केले. संगीत नाटक अकादमीमहाराष्ट्र गौरवनाट्यदर्पणबालगंधर्वमा. दिनानाथ स्मृती असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. भारत सरकारतर्फे १९८८ साली त्यांना पद्मश्री किताबही देण्यात आला होता.

संबंधित पोस्ट