महाआघाडी सरकार कोरोना संकटावर निष्फल झाल्याचा आरोप करीत कर्जतमधे भाजपाने केला सरकारचा निषेध!

कर्जत(धर्मानंद गायकवाड):- देशात सध्या कोरोना संकट आसताना महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीनी कोरोना संकटावर निष्फळ झालेल्या महाआघाडी सरकारचा ठिकठिकाणी निषेध नोंदविला आहे. त्याचप्रमाणे कर्जतमधील भारतीय जनता पार्टीच्या वतिने कर्जत शहरात आणि तालुक्यातील काही प्रमुख ठिकाणी भाजपाचा वतीने महाआघाडी सरकारचा निषेध केला आसल्याची माहीती भाजपाचे नेते सुनिलजी गोगटे यांनी दिली आहे.


कर्जत बाजारपेठ विठ्ठलनगर, कोतवालनगर, म्हाडा कॉलनी, दहिवली, सोनारआली,कोकण आली, सुयोग नगर, भिसेगाव एसटी स्टँड, गुंडगे पंचशील नगर, डॉआंबेडकर चौक अशा विविध भागात तेथील कार्यकर्त्यांनी नागरिकांनी हातात निषेध फलक व काळे मास्क सोशल डिस्टन्स पाळत उस्फुर्त पणे निषेध नोंदविला आहे.
 

याप्रसंगी भाजपाचे नेते तथा कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोकशेठ ओसवाल, भाजपाचे नेते सुनीलजी गोगटे, दीपक बेहेरे,  मंदार मेहेंदळे, स्नेहा गोगटे, स्वामीनी मांजरे, विशाखा जिनगरे, कल्पना दास्ताने, गायत्री परांजपे, स्वप्ना सोहोनी, प्रकाश पालकर, दिनू पुराणिक, रवी खराडे, विजय कुलकर्णी, स्नेहा पिंगळे, विजय जिनगरे, समीर घरलुटे, दिनेश सोळंकी, सुर्यकांत गुप्ता, मिलिंद खंडागळे, सुरज रावल, विशाल सुर्वे, मनोज रावल, पूनम रावळ, मारुती जगताप, प्रशांत उगले, रोहित बाफना, मयूर शितोळे, दिनेश भरकले, हरीश ठाकरे, सर्वेश गोगटे, नीलम गोसावी, वंदना मिश्रा, कल्पना गणात्रा, स्मिता सविते, राजांनी वैद्य व पंकज पाटील असे बहुसंख्य लोक सहभागी झाल्याचेही कर्जतचे भाजपाचे नेते सुनिलजी गोगटे यांनी पत्रकारांना सांगितले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट