ऑपरेशन ऑलआउट; ९४ सराईत गुन्हेगारांवर कारवाई - ६ ढाबे, लॉजवर कारवाई

लोकसभा निवडणूकी दरम्यान कायदासुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल, अशी कुठल्या प्रकारे अनुचित घटना शहर व परिसरात घडू नये, म्हणून गुन्हेगारांची तपासणी व धरपकड करण्यासाठी पोलिस आयुक्तालय हद्दीत गुरूवारी ‘मिशन आॅल आउट’ही विशेष मोहिम राबविन्यात अली, या मोहिमेत १३० सराईत गुन्हेगारांपैकी ९४ गुंडांवर पोलिसांनी कारवाई केली.
शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आयुक्तालय हद्दीत प्रत्येक पोलीस ठाणे निहाय ४ पथके तयार करून मोहिम राबविली. या मोहिमेला रात्री ११ वाजता एकाचवेळी सर्वत्र प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, सर्व पोलीसठाणेनिहाय सराईत गुन्हेगारांची यादी घेत पोलिसांनी परिसरात झाडाझडती घेतली. दहशत पसरवून शरीर व मालमत्तेविरूध्द गुन्हे करण्याची शक्यता असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. तडीपार गुन्हेगारदेखील यावेळी तपासण्यात आले. दरम्यान, इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत वडाळागावात एक तडीपार व मुंबईमधील सराईत गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागला. तसेच पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत तडीपार गणेश भास्कर याच्यावर मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. विविध जबरी गुन्ह्यांमध्ये हवे असलेले ६४ पैकी ९ गुन्हेगार पोलिसांना मिळून आले.
सर्व पोलीस ठाणे हद्दीत एकाचवेळी मोठ्या संख्येने पोलीस रस्त्यावर उतरल्यामुळे गुन्हेगारांची पाचावर धारण बसली. काहींनी आश्रय घेतलेले ‘अड्डे’ सोडले तर काहींनी लपून बसणे पसंत केले. यावेळी ९४ गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये काही तडीपार गुंडांचाही समावेश आहे.ही मोहीम पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली,

संबंधित पोस्ट