महाराष्ट्र राज्य भीम आर्मीच्या इतिहासातील अभूतपूर्व कामगार लढ्याची फलनिष्पत्ती.

सर्वच्या सर्व मागण्या मान्य

मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य भीम आर्मीच्या क्रांतीलढ्यातील एक सुवर्ण अध्याय म्हणून कायमचा कोरला गेलेला संघर्ष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील असंघटित कामगारांचा संघटित लढा. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दिपनगर येथील कंत्राटी कामगारांच्या विविध न्याय प्रश्नांवर भीम आर्मीच्या वतीने १६ फेब्रुवारीच्या सकाळी १०.०० वाजता बेमुदत धरणे आंदोलन अर्थात महाराष्ट्रात प्रचंड गाजलेले कामगार न्यायहक्क अधिकार आंदोलन सुरू करण्यात आले होते , हे आंदोलन न्याय मिळेपर्यंत म्हणजे २१ फेब्रुवारी पर्यंत सुमारे पाच दिवस सुरू होते. कडाक्याच्या प्रचंड थंडीला भीक न घालता , अवकाळी आलेल्या पावसाला न घाबरता , तहानभूक हरपून रात्रंदिवस हे न्याय आंदोलन सुरूच होते.सरतेशेवटी कामगारांच्या संघटित शक्तीचा विजय झाल्याचे जळगावच्या शक्तीगडालाही मान्य करावे लागले , आणि त्यांनी तसे जाहीरही केले. अशी माहिती भीम आर्मीचे प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

मौखिक स्वरूपात मागण्या मान्य झाल्या परंतु लिखित स्वरूपात मागण्या मान्य झाल्याचे पत्र हाती मिळाले नव्हते.पुन्हा दोन दिवस ह्या बाबीचा पाठपुरावा करावा लागला , तेव्हा २३ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६.३० वाजता भु.औ.वि.केंद्र दिपनगर येथील शक्तीगड प्रशासकीय कार्यालयातून  "कामगार न्यायहक्क अधिकार आंदोलन" ह्यातील सर्व मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र स्थानिक प्रशासनाने भीम आर्मीचे जिल्हाप्रमुख मा.गणेशभाई सपकाळे ह्यांच्या हाती देताच कार्यकर्त्यानी , कामगारांनी भीम आर्मी झिंदाबादच्या प्रचंड घोषणा दिल्या , असे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगितले.

             ह्यावेळी स्वतः जिल्हाप्रमुख मा.गणेशभाई सपकाळे , जिल्हा महासचिव मा.श्रीकांतभाऊ वानखेडे , जिल्हासचिव मा.सुपडूभाऊ संदनशिव , मुख्य संघटक मा.विक्रमभाऊ प्रधान , उपाध्यक्ष मा.विजय उर्फ डॉलीभाई वानखेडे , भुसावळ तालुकप्रमुख मा.विजयभाऊ मालवीय यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

मागण्या मंजुरी पत्र हाती मिळताच राज्यप्रवक्ते मा.रमाकांतजी तायडे आणि जिल्हाप्रमुख मा.गणेशभाई सपकाळे यांनी केंद्रीय अध्यक्षांपासून ते तळागाळातील सर्वच ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानल्याचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगितले.

जळगाव जिल्हा कार्यकर्त्यांच्या ह्या अभूतपूर्व यशाला कौतुकाची थाप मारण्यासाठी भीम आर्मीचे राज्यप्रभारी मा.दत्तूभाई मेढे आणि मुख्य महासचिव मा.सितारामबापू गंगावणे हे खासकरून भुसावळ मध्ये गेल्याने कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला.ह्यावेळी दत्तूभाई यांनी जळगाव टीमचे भरभरून अभिनंदन केले तर सितारामबापू गंगावणे यांनी सुद्धा राज्यप्रमुख मा.प्रफुल्लभाई शेंडे यांच्या माध्यमातून भीम आर्मी महाराष्ट्र राज्याच्या वतीने अभिनंदन करताना , जळगावकरांनो , तुमच्या प्रत्येक जनलढ्यात संपूर्ण भीम आर्मी तुमच्या सोबत असणार असल्याची ग्वाही दिल्याचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगितले. कामगार लढ्याची फलनिष्पत्ती. सर्वच्या सर्व मागण्या मान्य.संबंधित पोस्ट