वाघोबा धबधब्यावर गेलेल्या ७ जणांवर गुन्हा

पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील धबधबे, तलाव, धरणे, किल्ले व समुद्र किनारा येथे जाण्यास लागू केलेला मनाई आदेश डावलून वाघोबा खिंडीतील धबधब्यावर गेलेल्या ७ जणांविरुद्ध पालघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
              
पालघर-मनोर मार्गावरील चहाडे गावाच्या हद्दीत वाघोबा खिंडीत हा धबधबा असून या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात हौशी तरुण येत असतात. मौजमजा करताना अपघातही होत असल्याने पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील अशा धोकादायक ठिकाणी जाण्यास मनाई आदेश लागू केला आहे. तरीही मनाई आदेश डावलून वाघोबा खिंडीतील धबधब्यावर गेलेल्या ७ तरुणांविरोधात पालघर पोलिस स्टेशनमध्ये  भादविसं कलम १८८/२६९ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट