
उल्हासनगर महापालिकेने केल्या १७ करोड रुपयांच्या कोविड साहित्य खरेदीच्या निविदा रद्द .
- by Rameshwar Gawai
- Oct 07, 2020
- 790 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) :कोविड रुग्णांच्या उपचारासाठी १७ करोड रुपयांची खरेदी करण्यासाठी महा ई टेंडरच्या माध्यमातून निविदा काढली आहे. या निविदेच्या माध्यमातून होणाऱ्या उधळपट्टीला मनसे आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना निवेदन देत विरोध दर्शविला होता . अखेर महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या आदेशाने वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ . दिलीप पगारे यांनी निविदा रद्द केल्या आहेत.
उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सुमारे १७ करोड रुपये किंमतीच्या चार निविदा दोन महिन्यांपूर्वी काढण्यात आल्या होत्या. या निविदांमार्फत ८० नग आयसीयू बेड, २६२० नग हॉस्पिटल बेड, ७१ नग स्ट्रेचर, २७०० नग लॉकर, ११०० नग आय व्ही स्टॅन्ड, २७०० नग स्टुल, ७१ नग व्हील चेअर, १३५०० नग बेडशीट, ५४०० नग ब्लॅंकेट, ५४०० नग सोलापुरी चादर, २७०० नग उश्या, ६१० नग खुर्च्या, ६८ नग कर्मचाऱ्यांसाठी खुर्च्या, ६८ नग ऑफिस टेबल, १३८ नग मोठे कचऱ्याचे डब्बे, ६९७५ नग ओ २ मास्क, ६९७५ व्हेंटरी मास्क, ५२५ नग ऑरोफरींजियल एअरवे, ९० नग हजार फेसशिल्ड, ८१ हजार नग गॉगल, ९० हजार नग एन ९५ मास्क, ८१ हजार नग सर्जिकल मास्क, ९० हजार नग ग्लोव्हज , ४१००० नग पुर्नवापर ग्लोव्हज , ५० हजार नग कॅप, ८१ हजार नग मेडिकल मास्क, ५० हजार नग गाऊन ऍप्रोन, ४१ हजार शु कव्हर, ४०५ नग संरक्षणात्मक शूज, ७४३०४ नग सॅम्पल कलेक्शन किट्स, १५३५० नग आयव्ही सेट्स, १५३५० नग आयव्ही कॅनूला, ३२५० नग इंडॉक्टराचेल ट्युबस, १४२५० सक्शन ट्यूब्स, सीपॅप मशीन नग १७, अम्बू बॅग नग ७६, सक्शन मशीन नग ४०, कार्डियाक मॉनिटर नग ३६, सिरिंज पंप नग ७२५, यूव्ही लाईट फॉर स्टॅरिलायझेशन नग २, ग्लुकोमीटर स्ट्रिप्स बरोबर नग २९, पोर्टेबल लिक्विड टॅंक नग १०, हाय फ्लो नस्लकान्नूला नग ५०००, पोर्टेबल एक्सरे मशिन ७ नग, इसिजी मशीन नग ७, बी पी अप्पराटस नग ५९, हायड्रॉक्सोक्लोरोक्वीन नग १८५००, ओएसेलटॅमीवर ७५ एमजी नग १८५००, ओएसेलटॅमीवर ४५ एमजी नग ३७००, लिपो प्लस रिटो नग ६९५६, अझिथ्रोमायसिन ५०० एमजी नग ४६०००, पीसीएम नग ४३२०००, आयव्ही फ्लुइड डीएनएस नग २१०००, आयव्ही फ्लुइड डेक्सट्रॉस नग २१०००, आयव्ही फ्लुइड आर एल नग २१००० हे साहित्य आणि औषधांचा समावेश होता.
उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या घटली असल्याने उपलब्ध बेड खाली असताना अतिरिक्त बेडची गरज नसल्याची बाब समोर करीत ह्या चार निविदा रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी निवेदनाद्वारे आयुक्त डॉ .राजा दयानिधी यांच्याकडे केली होती. ही मागणी विचाराधिन असतानाच निविदेचा पहिला भाग उघडण्यात आला. यामध्ये पहिली निविदा सहा, दुसरी निविदा आठ, तिसरी निविदा पाच आणि चौथी निविदा चार ठेकेदारांनी भरली होती. मात्र एकही ठेकेदार तांत्रिक अटी शर्ती पूर्ण करू न शकल्यामुळे चार ही निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याचे आदेश वैद्यकीय आरोग्य अधिकारी दिलीप पगारे यांनी निर्गमित केले आहेत.
कोविड रुग्णांसाठी हवे असलेले साहित्य हे केंद्र शासनाच्या ई मार्केट प्लेस म्हणजेच जेम्स ह्या वेब पोर्टलवरून करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात महापालिकेचा फायदा होणार असून उच्च दर्जाचे साहित्य कमी किंमतीत महापालिकेला मिळणार असल्याचे मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी सांगितले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम