कर्जत रिपाइं शहरअध्यक्षांचा दणका ! रेल्वे स्थानकातील पादचारी पुल सुरू!

कर्जत- रायगड जिल्ह्यातील कर्जत रेल्वे स्थानकातील पुणे बाजुचा पादचारी पुल बंद असल्याने रेल्वे प्रवाशांना दीव मुठीत धरुन रोल्वे रुल ओलांडून प्रवास करावा लागत होता, त्यामुळे रिपाइ( आठवले) पक्षाचा शहरअध्यक्षा सौ. वैशाली महेश भोसले यांनी याबाबत रेल्वे प्रशासनास निवेदन देवुन ही पादचारी पुल लवकरच सुरु करणेची मागणी केली होती, अन्यथा आंदोलन करणेचा ईशारा दिला होता,     

सौ. वैशाली महेश भोसले,कर्जत शहर अध्यक्षा( रिपाइं)

त्याची दखल घेत अखेर आज रेल्वे प्रशासनाने सौ. वैशाली भोसले यांचा निवेदनाचा धसका घेत अखेर आज सदर पादचारी पुल पहाटेपासुन सर्व नागरिक आणि प्रवाशांसाठी खुला करण्यात आला असल्याने प्रवाशांमधे आनंदाचे वातावरण पसरले आहे, 

दरम्यान हा रेल्वे पुल सर्व प्रवाशांसाठी सुरु करणेस आल्याने येथे आता अपघात होणेची सुतराम शक्यता राहीली नसुन प्रवाशांनाही दिलासा मिळाला आहे, त्यामुळ कर्जतचा रिपाइंचा शहरअध्यक्षा सौ. वैशाली भोसले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच या रेल्वे पुलाचा प्रवाशांनी जा ये करणेसाठि वापर करुन रेल्वे रुल ओलांडून प्रवास करु नये असे आवाहन कर्जतचा रिपाइंचा शहर अध्यक्षा सौ. वैशाली भोसले यांच्याकडुन  प्रवाशांना करण्यात आले आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट