डोंबिवलीच्या अभिनव शाळेचा १०० टक्के निकाल

डोंबिवली (श्रीराम खंडू) : सालाबादप्रमाणे या वर्षीसुद्धा डोंबिवलीच्या अभिनव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश प्राप्त झाले आहे. विद्यालयाचा (आयसीएसई) आणि अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा मार्च २०२० मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल इयत्ता दहावी (आईसीएसई) १०० %, इयत्ता बारावीचा वाणिज्य शाखा १०० %, इयत्ता बारावीचा द्विलक्षी अभ्यासक्रम (बाय-फोकल) शाखा १०० % आणि इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेचा ९८ % निकाल लागला आहे.
      शाळेचे विश्वस्त सुशील सोनी, संचालक केदार सोनी, सह-संचालक प्रोदिप्ता सोनी आणि सर्व शिक्षक वृंदाने विद्यार्थ्यांना वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत यामुळे शाळेला घवघवीत यश प्राप्त झाले आहे. या सर्व विध्यार्थ्यांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांची नावे इयत्ता निहाय खालीलप्रमाणे आहेत

इयत्ता दहावी : आयसीएसई

1) कु. चैताली शेट्टी

2) कु. नमन जैन

3) कु. अर्हम जैन

इयत्ता बारावी : विज्ञान शाखा

1) कु. अखिलेश अय्यर

2) कु. आनंद मेनन

3) कु. स्वीटी सिंग

इयत्ता बारावी : वाणिज्य शाखा

1) कु. चिन्मय धर्माधिकारी

2) कु. लावण्या ईला

3) कु. संकेत फापळे

संबंधित पोस्ट