मनसे रोजगार व स्वयंरोजगार विभागामुळे मराठी दाम्पत्याला मिळाले हक्काचे घर !

मुंबईप्रतीक्षा नगर, सायन कोळीवाडा येथे श्री. जयवंत कोचरेकर (९८९२२७३६५७) या युवकाने १५ वर्षांपूर्वी म्हाडातील श्री. हर्षा मेंदडकर यांचा फ्लॅट विकत घेतला. त्या दोघांच्या व्यवहारात एक शर्मा नावाचा दलाल असल्यामुळे त्यांचा व्यवहार होऊन देखील फ्लॅट नावावर झाला नव्हता. हा विषय  गेली १५ वर्ष असाच अधांतरी राहिल्यामुळे कोचरेकर दांपत्य अत्यंत तणावात तेथे राहत होते. सध्या त्या फ्लॅटची किंमत रु. ९० लाख झाल्यामुळे मूळ मालक ट्रान्सफर करण्या साठी वाढीव किंमत मागू लागला. त्यामुळे कोचरेकरांचे बंधू श्री. राजेश कोचरेकर यांनी हा विषय रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे सरचिटणीस डॉ. शांताराम कारंडे यांच्याकडे मांडला. 

हिंदुजननायक मा. श्री. राज ठाकरे यांच्यावर लोकांचा विश्वास वाढत असल्याने या विषयाबाबत डॉ. शांताराम कारंडे यांनी रोजगार विभागाचे प्रदेश अध्यक्ष श्री. महेंद्र बैसाणे यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा विषय तडीस नेण्याचे मनोमन ठरवले. एका मराठी दांपत्याने आयुष्याची कमाई पणाला लावून आपल्या कुटुंबासाठी मुंबईत स्वतःचे घर असावे या हेतूने फ्लॅट विकत घेऊन पण तो अडवणुकीमुळे हातातून जातो की काय या विचाराने श्री. कोचरेकर यांना हृदयविकाराचा झटका आला. ही सर्व बाब व विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. कारंडे यांनी ताबडतोब मा. राज ठाकरे यांचे समर्थक असलेले बिल्डर श्री. विकी राणे यांच्या सहकार्याने मुळमालक श्री. हर्षा मेंदडकर यांना संपर्क करून त्यांच्याशी वाटाघाटी करून गेली १५ वर्षे रेंगाळत पडलेला विषय मार्गी लावला. अत्यंत परिश्रम घेऊन मंगळवार दि. १० नोव्हेंबर २०२० रोजी रीतसर करारपत्र व सेलडीड करून दिल्यामुळे  श्री. जयवंत कोचरेकर व सौ. शलाका जयवंत कोचरेकर यांनी अत्यंत समधानाने मा. राज ठाकरे यांचे मनापासून आभार मानले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट