कोरोना काळात ट्युशन घेणाऱ्या शिक्षिके विरोधात गुन्हा

■ जव्हारमध्ये मच्छी विक्रेत्यावर गुन्हा

पालघर (प्रतिनिधी/16 जुलै): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून शाळा-कॉलेज आजपर्यंत बंद आहेत तर खाजगी ट्युशनवर बंदी आहे. मात्र या बंदी काळातही विद्यार्थ्यांना बोलावून ट्युशन घेणाऱ्या पालघरमधील शिक्षिके विरोधात मंगळवारी (14 जुलै) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पालघर पोलीस स्टेशनमध्ये या शिक्षिके विरोधात भादंविसं 269/188 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जव्हार नगरपरिषद क्षेत्रात जाहीर झालेल्या काळात अनधिकृतपणे मच्छी विकणाऱ्या विक्रेत्यावरही मंगळवारी (14 जुलै) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मच्छी विक्रेता जव्हार नगरपरिषद क्षेत्रातील पाचबत्ती परिसरात रोड लगत मच्छी विकत असल्याचे आढळून आल्याने जव्हार नगरपरिषदकडून देण्यात आलेल्या तक्रारी नुसार जव्हार पोलीस स्टेशनमध्ये या मच्छी विक्रेत्याविरोधात भादंविसं 269/188 साथ रोग प्रतिबंध कायदा 2,3,4 तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट