कल्याण-डोंबिवलीतबर्ड फ्लूचे संकट.. बगळे, कबुतरे व कावळे मृत्युमुखी...

डोंबिवली(प्रतिनिधी)  महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली बगळे, कबुतरे आणि कावळे बर्ड फ्लूने मृत्युमुखी पडत आहेत. मंगळवारी कल्याणात दोन पान बगळे, मोहने परिसरात कबुतरे, तर डोंबिवलीतील कोपर गावात दोन कावळे मृत्युमुखी पडले आहेत. भर वस्तीत हे पक्षी तडफडून मरत असल्याने नागरीका मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी वैद्यकीय अधिकाऱ्या समवेत घटनास्थळी दाखल होत या मृत पक्ष्याचे नमुने घेत आहेत. सोमवारी आधारवाडी परिसरात रस्त्याच्या कडेला एक कावळा मृतावस्थेत सापडला होता. मंगळवारी कल्याण पश्चिमेकडील गौरीपाडा परिसरात दोन पान बगळे, मोहने परिसरात कबुतरे तर डोंबिवली पश्चिमेकडील कोपरगाव परिसरातील गावदेवी परिसरातील कावळ्याचे निवासस्थान बनलेल्या भागात दोन कावळे मृत्युमुखी झाले.  कोपर गावात सकाळपासून एक कावळा तडफडत होता. घशातून विचित्र आवाज काढत पंख पांघरलेल्या हा कावळा जीव वाचविण्यासाठी तडफडत होता. भरवस्तीत तडफडून मरणार्या या पक्ष्यामुळे नागरिक देखील भयभीत झाले असून दोन दिवसापासून पक्षी मरत असताना याबाबतची माहिती कोणाला द्यायची असा सवाल नागरिकाकडून केला जात आहे. दरम्यान वनविभागाला याची माहिती मिळाल्यावर  वनविभागाच्या अधिकार्यांनी तत्काळ घटनास्थळी पोचत या पक्ष्याचे नमुने गोळा केले.

संबंधित पोस्ट