गोदावरी नदीच्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्रंबकेश्वर, नाशिकमध्ये  सतत सुरू असलेल्या पावसामुळे मंगळवारी गंगापूर धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर आल्याने एकलहरे व ओढ्याला जोडणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने पाच गावांचा संपर्क तुटला.
एकलहरे-ओढा ला जोडनारा रस्ता गोदावरीला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेल्याने ओढा, एकलहरे, शिलापूर, लाखलगाव, चितेगाव फाटा आदी भागातील शेतकरी, विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. नाशिकरोडला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने शेतकरी व कामगारांचा या रस्त्याने राबता असतो.

एकलहरे येथील मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात ग्रामीण भागासह शहरी भागातील विध्यार्थी मोठ्या संख्येने येत असतात परंतु मंगळवारी व बुधवारी पूर परिस्थिती मुळे अनेकांना माघारी परतावे लागले. गेल्या १५ वर्षांपासूनची या ठिकाणी पूल व्हावा ही ओढा व एकलहरे नागरिकांची मागणी आहे. २००८ मध्ये आलेल्या पुरामुळे येथील गोदा पात्रावरील रस्त्यातील फरशी वाहून गेली होती.
गंगापूर धरणातून पुन्हा सुमारे 9 हजार कुसेक पाणी सोडल्यामुळे गोदावरी दुथडी वाहत आहे

संबंधित पोस्ट