नेरळ शहरालगत सापडलेल्या कोरोनाग्रस्त महीलेचा म्रुत्यु!तर कर्जत शहरात सापडला आणखी एक कोरोनाचा रुग्ण!
- by Adarsh Maharashtra
- May 24, 2020
- 2486 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील नेरळ-कळंब रस्त्यावरील धामोते गावाबाहेर असणाऱ्या नेरळ विद्या भवन शाळेच्या समोर असलेल्या एका फार्म हाऊस मध्ये राहणाऱ्या ६५ वर्षीय महिलेचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे नेरळ परीसरात प्रंचड खळबळ माजली होती. मात्र या कोरोनाग्रस्त महीलेचा ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना दोन दिवसांनी मृत्यू झाला आहे. तर कर्जत शहरात आणखी एक कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण सापडल्याने कर्जत शहरात प्रंचड खळबळ माजली आहे
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे, कर्जत शहरालगत मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी कोरोना पाॅझटीव्ह रुग्ण सापडल्याचा घटना. ताजी असतानाच आज पुन्हा कर्जत शहरातील संजय नगर मध्ये सलग दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला असल्याने प्रंचड भितीचे वातावरण कर्जत शहरात पसरले आहे.त्यामुळे गेली दोन महिने सुरक्षित असलेल्या कर्जतमधेही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरीकांनी प्रशासनाचा सुचना पाळाव्यात असे आवाहन जनतेला करण्यात येत आहे.
कर्जत तालुक्यांतील धामोते विद्या भवन शाळेसमोर त्या ६५ वर्षीय महिलेच्या संपर्कात अनेकजण आले होते. या महीलेचा संपर्कात आलेल्या सुमारे २५ लोकांच्या कोरोना टेस्टही कर्जत येथे घेण्यात आल्या होत्या. कर्जत शहरातील कर्जत उपजिल्हा रुग्णालयात swab घेऊन त्या टेस्ट मुंबई येथील जे जे रुग्णालयात घेण्यात आल्या. यावेळी या सर्व टेस्टचे रिपोर्टही आले आहेत. त्यातील ६५ वर्षीय महिलेच्या घरातील पाच व्यक्ती आणि अन्य तीन तसेच धामोते, चोरावले येथील तीन आणि. नेरळ गावातील खासगी दवाखान्यातील १७ व्यक्ती अशा सर्व २५ लोकांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आले असल्याचे सांगणेत येत आहे. तसे अहवाल जेजे रुग्णालयाकडून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात. प्राप्त झाले आसल्याची माहीती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडुन देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या अहवालामुळे धामोते, मालेगाव, दहिवली,नेरळ,चोरावले या गावातील नागरिक आणि ग्रामस्थ चिंतेत होते. मात्र या ६५ वर्षीय कोरोनाग्रस्त महीलेचा संपर्कातील अनेकांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने नेरळ शहरासंह कर्जत तालुक्यांतील अनेकांना दिलासा मिळाला आहे. कर्जत तालुक्यांतील काही ठिकाणी कोरोनाने शिरकाव केल्याने. नागरीकांनी प्रशासनाचा सुचनांचे पालन करावे असा सल्ला सुज्ञ देतात.
दरम्यान सुरुवातीलाच कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात कोरोनाने एंट्री केली होती. येथे पहीला रुग्ण सापडल्यानंतर धामोते परीसरातही एक ६५ वर्षीय महीलेला कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारादरम्यान या महीलेचा म्रुत्यु झाला आहे. त्यानंतर या महीलेचा संपर्कात आलेल्यांचा कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यात बोहरुन कोरोना येतो अशी चर्चा आसतानाच आज दुसरा कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण कर्जत शहरात सापडल्याने कर्जत शहरातही खळबळ माजली आहे. त्यामुळे आजचा हा दुसरा रुग्ण कर्जत शहरात सापडला आसल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम