
रबाळे गुन्हे प्रकटीकरण शाखेची एक नंबर कामगिरी २४ तासाच्या आत आरोपी गजाआड!
दैनिक आदर्श महाराष्ट्राच्या वृत्ताची दखल !
नवी मुंबई - रबाले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पैसे दुप्पट करून देतो असे अमिष दाखवणाऱ्या टोळीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद वनवे यांच्या पथकाने या टोळीच्या मुस्क्या आवळण्यात यश प्राप्त केले आहे
या कामगिरीने रबाळे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमचे नवी मुंबईच्या नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
याबाबत माहिती अशी की गोरेगाव या ठिकाणी राहणारे अशोक चंद्रकांत जोशी वय वर्ष (४९) धंदा इलेक्ट्रिकल राहणार गोरेगाव मुंबई व रमेश झिने वय वर्ष (६०) या दोघांना या टोळीने पैसे दुप्पट करतो म्हणून अमिष दाखवले होते या टोळीने २ लाख रुपये नकली पोलिसांच्या साह्याने उकळून पळ काढला होता अशा मथळ्याखाली दैनिक आदर्श महाराष्ट्र या वृत्तपत्रात बातमी प्रसारित करण्यात आली होती त्या बातमीची गंभीर दखल घेत रबाले पोलिसांनी २४ तासाच्या आत दोन आरोपी गजाआड केले आहे .
याबाबतची माहिती अशी की दिनांक ३/५/२०२४ रोजी रबाले पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अशोक चंद्रकांत जोशी व रमेश झिने यांनी रबाले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ कर्तव्यदक्ष पोलीस निरक्षक संजीव धुमाळ यांच्याकडे अर्जाद्वारे तक्रार केली होती त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दयानंद वनवे व त्यांचे सहकारी प्रसाद वायंगणकर यांनी याबाबतची गंभीर दखल घेत या तोतया पोलिसांचा शोध घेऊन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. या आरोपींनी तक्रारदाराकडून २ लाख इतकी रक्कम घेऊन पळ काढला होता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज च्या साह्याने आरोपींच्या मुस्क्या आवळण्यात रबाळे पोलीस यशस्वी ठरले आहेत.
दरम्यान. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी रबाले गुन्हे प्रकटीकरणाला अतिशय कर्तव्यदक्ष अशी टीम नेमलेली आहे.असा विश्वास नवी मुंबई नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम