इंडसइंड बँकेच्या आजी माजी अधिकाऱ्यांना बनावट शेअर्स ट्रेडिंग फ्रॉड गुन्ह्यामध्ये नवी मुंबई सायबर पोलीसांनी केली अटक !
नवीमुंबई : शेअर्स मार्केट ट्रेडिंग मधून चांगला नफा मिळत असल्याचे बनावट ॲपवर द्वारे फसवणूक करून तब्बल ३३.०५.०२३ इतक्या रकमेला गंडा घालणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्याला यश प्राप्त झाले आहे आरोपी हे इंडसइंड या बँकेचे आजी-माजी अधिकारी असून या आरोपींची नावे प्रवीण कुमार रमेश मिश्रा,वय वर्ष (२६) राहणार उल्हासनगर सध्या व्यवसाय बेकार हा आरोपी बँकेमध्ये माजी इसीबीडीएम या पदावर कार्यरत होता त्याचा साथीदार अशोक श्यामलाल चौहान राहणार कोळशेवाडी कल्याण हा
इंडसइंड या बँकेत बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर या पदावर कार्यरत आहे मुळगाव राहणारा अजमगड राज्य उत्तर प्रदेश असे आहे. आरोपी हा फिर्यादींला शेअर मार्केटचे अमिष दाखवून वेगवेगळ्या बँकेमध्ये ऑनलाइन पद्धतीने पैसे भरण्यास सांगत मात्र फिर्यादीची रक्कम परत न करता तो उडवा उडवीची उत्तरे देत असे याबाबत सायबर क्राईम नवी मुंबई याकडे फिर्यादीने तक्रार दाखल केली होती सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी या घटनेची दखल घेत या आरोपीच्या मुस्क्या आवळण्यास यश प्राप्त केले आहे या आरोपीकडून ४ मोबाईल ०८ सिम कार्ड ०७ डेबिट कार्ड ०२ चेक बुक विविध बँकेचे एटीएम कार्ड बँकेचे ०३ पासबुक ०६ रबरी स्टॅम्प कार्ड हस्तगत करण्यात आले आहेत हे आरोपी सायबर फसवणूक करिता वापरणारे बँक खाते हातळत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपीवर महाराष्ट्र सह भारतातील विविध राज्यातील ०४ ठिकाणी सायबर तक्रारीमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा तपासा दरम्यान उघड झाले आहे
दरम्यान ज्या फिर्यादीने सायबर क्राईम ला तक्रार दाखल केली होती. त्या फिर्यादीची रक्कम १५ लाख ३१ हजार ७६९ रुपये इतकी रक्कम गोठविण्याबाबत तात्काळ पत्र व्यवहार करून गोठविण्यास नवी मुंबई सायबर ठाण्याला यश प्राप्त झाले आहे.
न्यायालयाने आरोपींना ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली
सदरचा सायबर गुन्हा आव्हानात्मक काम नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे,पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपयुक्त गुन्हे शाखा नवी मुंबई अमित काळे,धनाजी क्षीरसागर, सहाय्यक पोलीस आयुक्त आ.गु.शा/सायबर यांच्या मार्गदर्श-नाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम पोलीस निरक्षक विशाल पादीर, उपनिरीक्षक रोहित बंडगर, पोलीस हवालदार विजय अहिरे, संदेश गुजर, पोलीस नाईक मंगेश गायकवाड, रविराज कांबळे, पोलीस शिपाई भाऊसाहेब फंटागरे टांगरे यांनी उघडकीस आणला आहे पुढील तपास सायबर शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम करत आहेत .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम