लाखोचा गंडा घालणाऱ्या आरोपींना नवी मुंबईच्या सायबर क्राईमने केले दोन घटनेतील आरोपी गजाआड!

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांची कौतुकास्पद कामगिरी !

नवी मुंबई :  शेअर्स मार्केट ट्रेडिंग मधून चांगला नफा मिळत असल्याचे बनावट ॲपवर द्वारे फसवणूक करून तब्बल २९ लाखाचा गंडा  घालणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्याला यश प्राप्त झाली आहे या आरोपींची नावे पियुष जवारीलाल लोढा वय वर्ष (३९) राहणार मिरा रोड मूळ राहणारा भिलवाडा राज्य राजस्थान असे आहे. आरोपी हा फिर्यादींला शेअर मार्केटचे अमिष दाखवून वेगवेगळ्या बँकेमध्ये ऑनलाइन पद्धतीने पैसे भरण्यास सांगत असे मात्र फिर्यादीची रक्कम परत न करता तो उडवा उडवीची उत्तरे देत असे याबाबत सायबर क्राईम नवी मुंबई याकडे फिर्यादीने तक्रार दाखल केली होती सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी या घटनेची दखल घेत या आरोपीच्या मुस्क्या आवळण्यास यश प्राप्त केले आहे या आरोपीकडून ७ मोबाईल १५ सिम कार्ड विविध बँकेचे एटीएम कार्ड बँकेचे पासबुक २ पॅन कार्ड  हस्तगत करण्यात आले आहेत या आरोपीवर महाराष्ट्र सह भारतातील विविध राज्यातील ३२ ठिकाणी सायबर तक्रारीमध्ये सहभाग असल्याचा तपासा दरम्यान उघड झाले आहे

दरम्यान ज्या फिर्यादीने सायबर क्राईम ला तक्रार दाखल केली होती. त्या फिर्यादीची रक्कम १६ लाख ७१  हजार ७५० रुपये इतकी भरलेली सर्व बँक खाते गोठविण्याबाबत तात्काळ पत्र व्यवहार करून सदरची रक्कम गोठविण्यास सायबर क्राईम ला यश प्राप्त झाले आहे.

 तर दुसऱ्या घटनेत आरोपीने आपापसात संगणमत करून शेअर्स खरेदी विक्री ट्रेडिंगच्या च्या नावाखाली जास्तीचा फायदा होत असल्याने बनावट ॲप दाखवून फिर्यादीची फसवणूक केल्याची घटना घडली होती फिर्यादीने याबाबत सायबर  क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती सायबर क्राईमने सखोल तपास करून आरोपीने वापरलेले सिम कार्ड बँक खाते मोबाईल क्रमांक याद्वारे पोलीस शिपाई नरहरी क्षीरसागर यांनी तांत्रिक तपास करून संशयित बँक खाते धारक आरोपी निलेश अरुण इंगवले वय वर्ष (३०) राहणार कामोठे नवी मुंबई मुळगाव (सातारा) याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्याने व त्याचा साथीदार संजय रामभाऊ पाटील वय वर्ष (४८) धंदा दूध विक्री व वाहन विक्री राहणार कामोठे या दोघांनीही मिळून फसवणूक केली असल्याची कबुली सायबर पोलिसांना दिली आहे. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी दिली असून आरोपी संजय पाटील याची  झडती घेतली असता ६ डेबिट कार्ड  ४ मोबाईल १० सिम कार्ड मिळून आले असल्याचे माहिती सायबर पोलिसांनी दिली आरोपी संजय पाटील हा सायबर फसवणूक करिता वापरणारे विविध बँकेतील पासबुक हातळात असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे या आरोपीवर महाराष्ट्र सह विविध राज्यात 10 सायबर तक्रारी मध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे फिर्यादी याने रक्कम भरलेला सर्व बँक खाते गोठविण्याबाबत सायबर पोलिसांनी तात्काळ पत्र व्यवहार करून १८ लाख ५१ हजार ५११ रुपये गोठविण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश प्राप्त झालेला आहे.

सदरचा आव्हानात्मक सायबर  गुन्हा, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे,पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपयुक्त गुन्हे शाखा नवी मुंबई अमित काळे,धनाजी क्षीरसागर, सहाय्यक पोलीस आयुक्त आ.गु.शा/सायबर यांच्या मार्गदर्शना-खाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम,पोलीस उपनिरीक्षक लिंकराम देवकते, पोलीस शिपाई एकनाथ बुरुंगले, पोलीस शिपाई नरहरी क्षीरसागर यांनी उघडकीस आणला आहे पुढील तपास सायबर शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम करत आहेत.

संबंधित पोस्ट