
रबाले पोलिसांची कारवाई १५ किलो गांजा केला जप्त!
नवी मुंबई : रबाले पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एका संशयित इसमाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्या इसमाकडे १५ किलो गांजा विक्रीसाठी एक या गोणी मध्ये आणल्याचे उघडकीस आले आहे या आरोपीचे नाव संतोष काशिनाथ शिंदे असे असून तो पारधी वस्ती अडवली भूतवली या परिसरामधला राहणार आहे
ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान परिसरातील अमली पदार्थांचा बिमोड करण्यासाठी रबाळे पोलिसांनी कार्यवाहीचे शस्त्र हातात घेऊन अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणून सोडले आहे.
दरम्यान रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ व पोलीस निरीक्षक गुन्हे थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी दयानंद वनवे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण पवार यांना गुप्त माहिती एका बातमीदार च्या माध्यमातून मिळाली होती त्यानुसार रबाले पोलिसांनी त्या परिसरामध्ये नजर ठेवून ३ लाख ८७ हजार किमतीचा गांजा हस्तगत करून करून कारवाई केली आहे
या कारवाईदरम्यान फूट पथावर बेकायदा खाद्य विक्री करणाऱ्या खाद्य विक्रेत्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे २२ बेशिस्त वाहन चालकावर व मद्य प्राशन करणारे ६ इसमावर कारवाई केली आहे दारूबंदी कायदा अन्वय एक इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे व इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम