झुंजार पत्रकार दशरथ चव्हाण यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान!

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अभिनंदन!..

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ या संघाच्या वतीने नवी मुंबईतील शोषित कामगार पीडित यांचा झुंजार आवाज म्हणून ओळखले जाणारे पत्रकार दशरथ चव्हाण यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त झालेला आहे. दशरथ चव्हाण यांच्या लेखणीला सलाम करत हा पुरस्कार पत्रकार संघटनेचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे व पत्रकार संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या २२ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात हा पुरस्कार दशरथ चव्हाण यांना देण्यात आला.

दशरथ चव्हाण यांनी गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारी क्षेत्रामध्ये पदार्पण करून त्यांनी त्यांची लेखणी न्याय हक्काच्या बाजूने झिजवली या लेखणीची दखल घेऊन दशरथ चव्हाण यांना हा पुरस्कार दिले असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान: एक सच्चा प्रमाणिक पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराला हा उत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल नवी मुंबई मधील पत्रकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ वरिष्ठ आणि तरुण पत्रकारांनी सुद्धा आनंद व्यक्त केला आहे.

आम्ही गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता करतो मात्र आम्हाला असे राज्यस्तरीय किंवा स्थानिक पुरस्कार आतापर्यंत प्राप्त झाले नाहीत मात्र दशरथ चव्हाण यांच्या झुंजार पत्रकारितेची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने दिल्याबद्दल आम्ही त्यांचे व संघटनेचे सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे  अभिनंदन करतो.

(नवी मुंबईतील पत्रकार)

संबंधित पोस्ट