रात्रीची घर फोडी करून पसार होणाऱ्या चोरट्याला रबाळे पोलिसांनी केले जेरबंद !गुन्हे प्रकटीकरण विभागाची कारवाई
नवी मुंबई : रात्रीच्या वेळी घर बंद असल्याचा फायदा घेत घर फोडी करणाऱ्या चोरट्यांच्या मुस्क्या आवळण्यात रबाळे गुन्हे प्रकटीकरण पोलिसांना यश प्राप्त झाले आहे या चोरट्याचे नाव अंकुश उत्तम ढगे वय वर्ष (३९) राहणार जिजामाता नगर घणसोली गाव नवी मुंबई असे आहे
आरोपी अंकुश उत्तम ढगे हा रात्रीच्या वेळी संशयास्पद घनसोली विभागात फिरत असल्याचे गुन्हा प्रकटीकरण शाखेचे अधिकारी दीपक खरात यांना आढळून आला त्याचवेळी दीपक खरात व त्यांच्या पथकाने आरोपी अंकुश ढगे यांचा पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले त्याच्याकडे घर फोडी साठी वापरले जाणारे हत्यार स्क्रू ड्रायव्हर लोखंडी स्क्रू पाना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस खाक्या दाखवताच आरोपीने आतापर्यंत १२ घरफोड्या केल्या असल्याचे कबूली दिली आहे
दरम्यान रबाले पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादी रघुनाथ सखाराम शेलार वय वर्ष (४३) हा फिर्यादी घरी नसताना त्याच्या घराची घरफोडी होऊन २ लाख ३७ हजार इतक्या किमतीचे सोन्याच्या व चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरल्याची फिर्याद रबाले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती त्यानुसार रबाले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता या तपासा दरम्यान आरोपी अंकुश ढगे याला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी शेलार यांच्या घराची घरफोडी केली असल्याची कबुली दिली आहे व एकूण १२ घरफोड्या केल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी या सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कोपरखैरणे, रबाले एमआयडीसी,आझाद मैदान पोलीस ठाणे, कोनगाव पोलीस ठाणे,एम एम जोशी मार्ग पोलीस ठाणे,इत्यादी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत याबाबत अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी दीपक खरात एक करत आहेत.
याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त संजय ऐनपुरे, पोलीस उपायुक्त पंकज डहाने, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश गावडे यांनी रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास जेरबंद करा अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा उम्नेश थिटे, यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोपीच्या मुस्क्या आवळल्या गेल्या आहेत.
या कामे गुन्हे प्रकटीकरणाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक खरात, पोलिस हवालदार निलेश भोसले,पोलिस हवालदार दर्शना कटके,पोलीस नाईक गणेश वीर, पोलीस नाईक, मयूर सोनवणे,व पोलीस शिपाई यादराव घुले, यांनी महत्त्वाची भूमिका बजावली
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम